शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी-मंगळ पिशाच योग: ५ राशींनी असावे अखंड सावध, हितशत्रूंचा त्रास; खर्चात वाढ, १ महिना खडतर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:59 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार अनेकार्थाने ऑक्टोबर महिना विशेष ठरत आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह तूळ राशीत विराजमान आहे. या राशीत सध्या केतु ग्रह आहे. या दोघांची युती फारशी शुभ मानली जात नाही. यातच नवरात्रानंतर नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध हे दोन्ही ग्रह एक दिवसाच्या फरकाने तूळ राशीत येत आहेत. त्यामुळे तूळ राशीत चर्तुर्ग्रही योग जुळून येत आहे.
2 / 9
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी कुंभ राशीत वक्री आहे. ज्योतिषशास्त्रात असे काही युती योग सांगितले गेले आहेत. ज्याचे अतिशय प्रतिकूल परिणाम होतात, अशी मान्यता आहे. मंगळाच्या तूळ राशीतील प्रवेशानंतर शनी आणि मंगळाचा पिशाच योग तयार होत असून, हे ग्रह एकमेकांपासून नवमपंचम स्थानी आहेत.
3 / 9
मंगळ ग्रह तूळ राशीत १६ नोव्हेंबरपर्यंत विराजमान आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा पिशाच योग काही राशींसाठी प्रतिकूल मानला जात असून, आगामी काळ संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी-मंगळ पिशाच योग संमिश्र ठरू शकेल. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. हितशत्रू आणि विरोधक नुकसान करू शकतात. कोणत्याही मालमत्तेबाबत वाद सुरू असेल तर तुम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जोखमीचे निर्णय घेणे टाळा. ज्याची माहिती नाही असे काम करणे टाळावे.
5 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना शनी-मंगळ पिशाच योग संमिश्र ठरू शकेल. उत्पन्न चांगले असले तरी बचत करणे कठीण होईल. खर्च वाढेल. आरोग्याच्या बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जवळच्या नातेवाईकाचा अविश्वास आणि अव्यवहार्यपणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. कोणावरही अतिआत्मविश्वास टाळावा अन्यथा नुकसान होऊ शकते. मुलांच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
6 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी-मंगळ पिशाच योग संमिश्र ठरू शकेल. अचानक अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढेल. वेळेप्रसंगी बचतीमधील पैसे खर्च करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना शनी-मंगळ पिशाच योग संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात खूप संयम बाळगावा लागेल, अन्यथा तुमच्या राग आणि आक्रमकतेमुळे नात्यात तणाव वाढू शकेल. अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागेल. अचानक पैसे खर्च करावे लागतील. कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करताना काळजी घ्या, अन्यथा पैसे अडकू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी-मंगळ पिशाच योग संमिश्र ठरू शकेल. पुढील महिनाभर कोणताही निर्णय अतिशय गांभीर्याने घ्यावा. घाईत घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. आरोग्याबाबतही सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. राग आणि आक्रमकपणामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये नुकसान होऊ शकते.
9 / 9
ऑक्टोबर महिन्यात भाद्रपद सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आणि अश्विन पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य