शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ दिवस शनी अस्त: ‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 6:51 AM

1 / 10
जानेवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अद्भूत ठरल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात बुध, मंगळ यांचे चलनबदल झाले. तसेच शुक्र, शनी यांचे राशीपरिवर्तन झाले. मात्र, यातच १७ जानेवारी रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केलेला शनी अवघ्या १८ दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अस्तंगत होत आहे. (shani asta in kumbha rashi 2023)
2 / 10
४ फेब्रुवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. शनीचा अस्त सुमारे महिनाभर चालणार आहे. ०६ मार्च रोजी अस्त असलेल्या शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. एखादा ग्रह अस्त किंवा अस्तंगत होणे म्हणजे नेमके काय? ते पाहुया... (shani asta 2023)
3 / 10
एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.
4 / 10
यानुसार, आताच्या घडीला सूर्य मकर राशीत आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील. सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर जाईल. त्यामुळे ४ फेब्रुवारी २०२३ ते ०६ मार्च या कालावधीत शनी अस्तंगत राहील.
5 / 10
मूलत्रिकोणातील कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर लगेचच शनीचे अस्त होणे विशेष मानले जात आहे. शनीचे अस्तंगत होणे काही राशींना लाभदायक ठरू शकेल. तर काही राशींना या कालावधीत समस्यांचा, अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना शनीचा अस्त संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...
6 / 10
मेष राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही कारणांमुळे तुमची सामाजिक प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. पैशाच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. कुठेही पैसे गुंतवले नाहीत तर उत्तम. वैवाहिक जीवनात कुरबुरींचा सामना करावा लागू शकतो. शनिवारी दानधर्म करावा.
7 / 10
कर्क राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वाद वाढू शकतात. खूप सावध राहण्याची गरज आहे. करिअरबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. जोडीदाराशी भांडण वाढू शकते. दर शनिवारी हनुमान पूजन करावे आणि सुंदरकांड पठण करावे.
8 / 10
सिंह राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमचे बजेट बिघडू शकते. एखाद्या अप्रिय बातमीमुळे मन खिन्न होऊ शकते. व्यवसाय करणार्‍यांसाठी आगामी काळ कठीण आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करावा. प्रत्येक शनिवारी व्रत ठेवा आणि शनिदेवाची पूजा करा.
9 / 10
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल.भावंडांसोबतचे मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणे टाळा. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. व्यवसायात कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळा. प्रवासात विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
10 / 10
कुंभ राशीत शनीने प्रवेश केला असून, याच राशीत सुमारे ३१ दिवसांसाठी शनी अस्त होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ संमिश्र ठरू शकेल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय खूप विचार करून घ्यावा. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे. ऑफिसमध्ये बॉसचा खूप दबाव सहन करावा लागू शकतो. व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य