शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी मकरेत मार्गी: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना अपार यश; धनलाभाचे उत्तम योग, शुभ गोष्टी घडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 3:43 PM

1 / 9
नवग्रहांमध्ये न्यायाधीश मानला गेलेला शनी आताच्या घडीला मकर राशीत वक्री चलनाने विराजमान झालेला आहे. त्यामुळे सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरू आहे. यानंतर काही दिवसांनी शनी मकर राशीतच मार्गी होणार आहे. (shani direct in capricorn 2022)
2 / 9
ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी शनी मकर राशीत मार्गी होणार आहे. यानंतर पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये शनी मार्गी चलनाने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. ऑक्टोबर २०२२ मध्ये शनीचे मार्गी होणे शुभ संकेत असल्याचे सांगितले जाते. (shani margi in makar rashi 2022)
3 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते. २३ ऑक्टोबर २०२२ पासून शनी मकर राशीत मार्गी होत आहे. काही लोकांसाठी शनीच्या संक्रमणामुळे काळ खूप आव्हानात्मक असेल, तर काही लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येईल.
4 / 9
शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. शनी देव मार्गी झाल्यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मकता, यश, धनलाभाचे योग, करिअर, नोकरीत उत्तम लाभ मिळू शकतील. ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी चलन यशकारक ठरू शकेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. आर्थिक लाभाचे योगही होतील. तसेच यावसायिकांना या काळात कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना मान-सन्मान मिळेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी चलन प्रगतीकारक ठरू शकेल. तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. व्यावसायिक स्तरावर येणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा निघेल. वैवाहिक जीवनात अडचणी आल्या तर त्या दूरही होऊ शकतात. ज्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली होती त्यांनाही या काळात योग्य परिणाम मिळू शकतात. आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. या काळात वडीलधाऱ्यांची साथ मिळेल.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी चलन शुभ ठरू शकेल. तूळ राशीच्या लोकांवर शनीच्या ढिय्या दशेचा प्रभाव असला, तरी हा काळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ सिद्ध होऊ शकतो. आर्थिक समस्या संपुष्टात येऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मानसिक चिंतांपासून मुक्ती मिळू शकते. घरातील कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ शकते.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी चलन सकारात्मक ठरू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. या काळात भौतिक सुख मिळू शकते. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत सापडू शकतील. संचित संपत्तीतही वाढ होईल. लहान भावंडांसोबत काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर त्यावरही या काळात मात करता येईल. सैन्य, पोलीस दलात कार्यरत असणाऱ्यांना विविध पातळींवर यश मिळू शकते.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी चलन शुभलाभदायक ठरू शकते. या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. तुम्‍ही तुमच्‍या उर्जेचा योग्य प्रकारे वापर करू शकता. याचे भविष्‍यात आनंददायी परिणाम मिळू शकतील. धार्मिक कार्यातही भाग घेऊ शकतात. या काळात स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी योग-ध्यान करणे उपयुक्त ठरू शकेल. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. काही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी घरातील सदस्यांची संवाद साधणे फायद्याचे ठरू शकेल. अडचणी दूर करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. - सदर माहिती ही सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, शनीच्या तुमच्यावरील प्रभावासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य