शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Gochar 2023: अडीच वर्ष शनी राहणार मूलत्रिकोण राशीत; २०२५ पर्यंत 'या' राशींची चांदीच चांदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 4:10 PM

1 / 13
शनी ही न्यायाची देवता म्हणून ओळखली जाते. मकर आणि कुंभ रास ही शनी देवाची निवास स्थाने आहेत. अलीकडे म्हणजेच २०२३ च्या सुरुवातीला शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून पुढची अडीच वर्षे तो तिथे मुक्कामी राहणार आहे. ही मूळत्रिकोण अवस्था म्हटली जाते. अर्थात मकर, कुंभ या शनी देवाच्या हक्काच्या राशी आणि मीन राशीवर छाया त्यामुळे झालेला त्रिकोण आणि मीन राशीला सुरु झालेली साडेसाती, इ. माहितीबद्दल जाणून घेऊ.
2 / 13
मेष राशीसाठी अडीच वर्षे थोडीफार संघर्षाची असू शकतील. कारण या अडीच वर्षांनी मेष राशीची साडेसाती सुरु होऊन हे चक्र पुनश्च फिरू लागेल. तरीदेखील या काळात संयमाने वागावे लागेल. अकारण कोणाशीही वाद ओढवून घेऊ नका. वादाचे विषय टाळा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या.
3 / 13
वृषभ राशीसाठी शनिदेवाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. कारण शनिदेव तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात भ्रमण करत आहेत. याशिवाय त्यांनी शश राजयोगही तयार केला आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा फायदा होईल.
4 / 13
मिथुन राशीच्या नवव्या घरात शनिदेवाचा राशी बदल झाला आहे. यासोबतच तुमच्या कुंडलीत शश महापुरुष राजयोग देखील तयार होत आहे. या दरम्यान तुम्हाला कामाच्या दरम्यान प्रवास करावा लागू शकतो. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. हा राजयोग तुमच्यासाठी अडीच वर्षे खूप फायदेशीर ठरेल.
5 / 13
शनीचे स्थलांतर कर्क राशीसाठी लाभदायी ठरेल. या अडीच वर्षात केलेली बचत दीर्घकाळ लाभ देणारी ठरेल. या काळात नोकर दारांना बढती तसेच बदलीची संधी मिळेल. व्यावसायिकांना व्यापार वाढीच्या नवीन संधी मिळतील. त्याचा लाभ करुन घ्यावा. नवे मित्र जोडताना त्यांची संपूर्ण माहिती घेऊनच सख्य करावे अन्यथा नुकसान होऊ शकते.
6 / 13
सिंह राशीच्या जातकांना शनीचे स्थलांतर संमिश्र फळ देणारे असेल. व्यापार उदीमास चालना मिळेल. नीट चौकशी न केल्यास मोठा धोका संभवतो. त्यामुळे नवे नाते, नवा व्यवसाय किंवा नवे मित्र जोडताना जरा जपून पाऊल उचलावे. या काळात आपणास रागावर नियंत्रण आणावे लागेल. शनी महाराजांचा जप तुम्हाला निश्चितच लाभदायी ठरू शकेल.
7 / 13
कन्या राशीच्या लोकांसाठी पुढील अडीच वर्षे काहीशी खडतर तर काहीशी यश देणारी असतील. संघर्ष करावा लागेल. प्रामाणिकपणे केलेले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. त्यामुळे पुढचा मार्ग आपोआप सुकर होईल. याउलट कामात, अभ्यासात केलेला आळस दीर्घकाळ त्रासदायक ठरेल. तुमच्या कामावर शनी देवाचे लक्ष असेल हे ध्यानात ठेवा!
8 / 13
तूळ राशीसाठी हा काळ परीक्षेचा ठरू शकतो. शनी देव प्रत्येक राशीच्या जातकाची परीक्षा घेतात. तूळ राशीच्या जातकांनादेखील या काळात त्यांच्या कर्तव्यस्थळी विविध प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल. हा काळ थोडा खडतर असेल. मात्र तुम्ही तुमच्या कामावर दाखवलेली निष्ठा तुमचे भवितव्य उज्ज्वल बनवेल.
9 / 13
वृश्चिक राशीच्या लोकांना येत्या अडीच वर्षात मिळालेली संधी टिकवून ठेवणे आणि आपल्या कार्यक्षेत्रात मजल मारणे आव्हानात्मक ठरेल. प्रयत्न योग्य दिशेने असतील तर त्याला ग्रहांचे पाठबळ मिळेल आणि शनी कृपेचाही वर्षाव होईल. या परीक्षेच्या काळात शनी उपासना करणे विसरू नका. शनी मंदिरात जा, शनी स्तोत्र म्हणा आणि ज्येष्ठांची सेवा करा, मेवा आपोआप मिळेल.
10 / 13
धनु राशीची साडेसाती नुकतीच संपलेली असल्यामुळे या शनी स्थित्यंतराचा त्यांच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. उलटपक्षी त्यांच्या प्रगतीची दारे आता सताड उघडली झाली आहेत. शनी देवांच्या परीक्षेत तावून सुलाखून निघाल्यामुळे त्यांच्यासाठी यशाचा मार्ग मोकळा असेल, मात्र खडतर मेहनत घ्यावी लागेल.
11 / 13
मकर राशीचा साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यात मकर रास ही शनी देवाची रास असल्यामुळे या राशीवर शनी देवाची सातत्याने नजर असते. म्हणून मकर राशीच्या जातकांना दर वेळी यशप्राप्तीसाठी दीर्घ काळ संघर्ष करावा लागतो. मात्र येत्या अडीच वर्षात उत्कर्षाची संधी चालून आलेली असल्याने अडलेली कामे मार्गी लागतील. जीवनाला नवीन दिशा प्राप्त होऊन सारेकाही मनासारखे घडेल.
12 / 13
शनिदेवाचा हा राशी बदल कुंभ राशीतच झाला आहे. तुम्हालाही अडीच वर्षांसाठी राजासारखं आयुष्य दिलं जाईल, या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. यासोबतच मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप खास असणार आहे.
13 / 13
नुकतीच मीन राशीची साडेसाती सुरु झाली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी शनीचे स्थित्यंतर हे परीक्षा पाहणारे तसेच यशाचा काळ दर्शवणारेदेखील ठरू शकते. मेहनत, सेवाभाव, प्रामाणिकपणा ठेवून आपले काम चोख केल्यास शनी देवाची कृपादृष्टी लाभेल. या अडीच वर्षात शनी देवांच्या उपासनेचाही लाभ होईल. त्यात कसूर करू नका. हे ही दिवस जातील!
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य