शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीचे गुरु नक्षत्रात गोचर: ६ राशींना यश, जुनी येणी वसूल होतील; नोकरीत लाभ, व्यापारात नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 7:16 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात एखादा ग्रह जसा राशीपरिवर्तन करतो, तसेच तो नक्षत्र गोचरही करत असतो. नवग्रहांपैकी सर्वांत कमी वेग असलेला आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला ग्रह म्हणजे शनी. आताच्या घडीला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. सन २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन ही गुरुचे स्वामित्व असलेली रास आहे.
2 / 9
तत्पूर्वी १८ ऑगस्ट रोजी शनी पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात गोचर करणार आहे. या नक्षत्राचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत शनी या स्थानी असणार आहे. शनीच्या या नक्षत्र गोचराचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
शनीचे गुरुच्या नक्षत्रात होत असलेले गोचर अनेक राशींसाठी फायदेशीर, लाभदायक, यश-प्रगतीची संधी घेऊन येणारे ठरू शकेल. आर्थिक आघाडी, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, करिअर क्षेत्रावर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष: अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक तंगीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. संपत्तीत वाढ होऊ सकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकेल. अनेक दिवसांपासून वाहन, मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते आता पूर्ण करता येणे शक्य होऊ शकेल. व्यवसायात नफ्यासह यश मिळवू शकता.
5 / 9
मिथुन: प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. बौद्धिक क्षमता वाढेल. अनेक आघाड्यांवर यशस्वी होऊ शकता. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. कुटुंबातील अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या आता संपुष्टात येऊ शकते.
6 / 9
तूळ: नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. यवसायात अडकलेले पैसे यशस्वीरित्या वसूल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आनंद होईल. इच्छा पूर्ण होऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. अनावश्यक खर्च कमी होऊ शकतील. पैसे वाचवण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहन इत्यादी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.
7 / 9
मकर: अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. मन प्रसन्न राहू शकेल. जुने थकित पैसे परत मिळू शकतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी होऊ शकाल. मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात अनेक नवीन संधी मिळू शकतात. प्रमोशन मिळू शकते. पगारात भरीव वाढ होऊ शकते.
8 / 9
कुंभ: शनीचे स्वामित्व असलेल्या या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. शनि कृपेने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. व्यवसायात वाढ तसेच विस्तार करणे शक्य होऊ सकेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकेल. तीर्थस्थळी जाण्याचे योग येऊ शकतील.
9 / 9
मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरुचेच स्वामित्व असलेल्या नक्षत्राच्या चरणात शनी गोचर करणार आहे. मीन राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. गुरुची विशेष कृपा लाभू शकते. तसेच शनी नक्षत्र गोचराचा विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिक लाभ होऊ शकतो. पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. हा काळ यशाने परिपूर्ण असू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य