शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Jayanti 2024: आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी शनि जयंतीला आहे सुवर्णसंधी; करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 1:00 PM

1 / 6
६ जून रोजी शनी जयंती (Shani Jayanti 2024)आहे. या दिवशी शनी देवाची यथोचित उपासना करून तुम्ही तुमच्या अडचणीतून मार्ग काढू शकता. त्यासाठी फार साधे सोपे उपाय ज्योतिष शास्त्राने दिले आहेत, ते जाणून घ्या आणि अमलात आणा. यथावकाश तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सापडेल.
2 / 6
शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे परिधान करा. सूर्याला अर्घ्य द्या.
3 / 6
त्यानंतर शनी मंदिरात जा. तिथे थेट मूर्तीसमोर न बसता थोडे कोपऱ्यात बसा. राईच्या तेलाचा दिवा लावा आणि 'ओम नीलांजन समभासं रवी पुत्रम यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर ही उपासना घरीच करा.
4 / 6
मंत्र म्हणून झाल्यावर शनी देवाची पुढे दिलेली दहा नावे भक्तिभावे उच्चारावीत - शनैश्चरा, शांता, सार्वभीष्ट प्रदायीन, शरण्या, वरेण्या, सर्वेशा, सौम्य, सर्वज्ञ, सुरलोकाविहारीण, सुखसनोपविष्ट!
5 / 6
उडीद लोखंड, मोहरीचे तेल, काळे कपडे, काळी गाय, काळ्या चपला, अन्न यापैकी ज्या गोष्टी दान करणे तुम्हाला शक्य असेल त्या गरजू व्यक्तीला अवश्य दान करा.
6 / 6
केवळ या उपायांनी शनी पीडेतुन तुमची सुटका होईल, शनी दशा, साडेसातीचा काळ सुसह्य होईल आणि तुमच्या अडचणीतून मार्ग सापडून जीवनाला योग्य दिशा मिळेल.
टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष