शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 9:12 AM

1 / 10
ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्मकारक ग्रह मानला गेला आहे. नवग्रहांचा न्यायाधीश म्हणून शनी ग्रहाकडे पाहिले जाते. एका राशीत शनी अडीच वर्ष विराजमान असतो. शनीचे वक्री होणे, मार्गी होणे केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पाडणारे असते, असे सांगितले जाते.
2 / 10
विद्यमान घडीला शनी कुंभ राशीत विराजमान आहे. शनी कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. वर्ष २०२५ मध्ये शनी गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे.
3 / 10
तत्पूर्वी, १५ नोव्हेंबर रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे. शनीचे मार्गी होणे अनेक राशींसाठी लाभदायक, फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...
4 / 10
मेष: करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. सर्वजण कल्पनांचे स्वागत करतील. त्यांच्याशी सहमत होतील. नवीन संकल्पना व्यवसायात यश मिळवून देऊ शकतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नशिबाची पूर्णपणे साथ लाभू शकेल. शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकेल.
5 / 10
वृषभ: शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. हा नवीन प्रयोग चांगला नफा मिळवून देऊ शकेल. नोकरदार प्रगती करतील. ध्येय सहज साध्य करतील. नियोजित योजना यशस्वी होतील. बँक बॅलन्स वाढेल. वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल.
6 / 10
मिथुन: शनी मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. नशिबाची साथ लाभेल. बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. व्यवसायिकांना कमाईच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. देश-विदेशात फिरू शकता. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
7 / 10
कर्क: व्यवसायात गती येईल. जे शनिदेवाशी संबंधित व्यवसाय करतात, जसे की लोखंड, तेल त्यांच्या व्यवसायात शनी मार्गी होणे प्रगतीकारक ठरू शकेल. त्यांचे काम वेगाने पुढे जाईल. अनेक पटींनी नफा मिळण्याची संधी मिळेल. नवीन ऑर्डर मिळतील. कुटुंबाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकेल.
8 / 10
कन्या: सुवर्ण काळ सुरू होऊ शकेल. जुन्या कर्जापासून मुक्ती मिळू शकेल. कुटुंबातील कोणी दीर्घ आजाराने त्रस्त असेल तर दिलासा मिळू शकेल. आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. परंतु, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
9 / 10
मकर: शनी मार्गी होणे शुभ ठरू शकते. अचानक धनलाभासह अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत घालवला जाईल. व्यवसायात पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. संपत्ती वाढेल. नशिबाची साथ मिळेल. संवाद सुधारेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतील.
10 / 10
कुंभ: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यक्तिमत्व आकर्षक होईल. आत्मविश्वास वाढेल. व्यापार-उद्योग किंवा भागीदारीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तशी संधी मिळू शकेल. मोठे यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास