शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी मार्गी: ८ राशींची दिवाळी, सर्वोत्तम संधी; यश-प्रगती, पद-पैसा-प्रतिष्ठेत वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:39 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी कुंभ राशीत आहे. कुंभ ही शनीची स्वराशी आहे. शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश नामक राजयोग निर्माण झालेला आहे. शनी हा मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याचे गोचर हे वैविष्ट्यपूर्ण मानले गेले आहे. कुंभ राशीत वक्री असलेला शनी दिवाळीच्या कालावघीत मार्गी होत आहे.
2 / 12
शनी कुंभ राशीत असल्यामुळे आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. सन २०२५ मध्ये शनी ग्रह मीन राशीत गोचर करणार आहे. या गोचरामुळे मकर राशीची साडेसाती संपणार असून, मेष राशीची साडेसाती सुरू होईल.
3 / 12
तत्पूर्वी मार्गी होत असलेल्या शनीच्या शुभ प्रभावामुळे अनेक राशींची दिवाळी होणार आहे. विविध क्षेत्रात उत्तमोत्तम लाभ, फायदा, नफा, संधी, यश-प्रगती होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: शश राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात असे अनेक सौदे मिळू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरदारांची प्रगती होईल. नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.
5 / 12
वृषभ: व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील. सतत फायदा होईल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. साधनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळतील. शहाणपणाने निर्णय घेतल्यास इच्छित नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पदोन्नती आणि इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते.
6 / 12
मिथुन: शनी मार्गी होणे आणि शश राजयोग फायदेशीर ठरू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. शुभ परिणाम प्राप्त होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नोकरीत चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात चांगला सौदा मिळू शकतो. चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील.
7 / 12
कर्क: लोखंड, तेल या संबंधी व्यवसाय करत असाल किंवा करू इच्छित असाल तर हा काळ उत्तम असणार आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतील. सतत फायदा होईल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायातही खूप प्रगती होईल.
8 / 12
कन्या: अनेक बाबतीत दिलासा मिळू शकतो. आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि साधनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
9 / 12
वृश्चिक: शनी मार्गी अन् शश राजयोग अनुकूल ठरू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. घर, वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. येणारा काळ नोकरीसाठी चांगला राहील. कामाच्या ठिकाणी काही यश मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी वाढतील.
10 / 12
मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. आगामी काळ शुभ आणि लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आर्थिक लाभाच्या संधी वाढण्याची चिन्हे आहेत. मान-सन्मानात वाढ होईल. नवीन काम मिळणे सोपे जाईल. कोणतीही नवीन कल्पना व्यवसायात प्रभावी ठरू शकते. नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही या काळात यश मिळू शकते. नशिबाची साथ लाभेल.
11 / 12
कुंभ: शश राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल. नियोजित योजना यशस्वी होतील. पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित अशा बातम्या मिळू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरदारांची प्रगती होईल. नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. व्यक्तिमत्व आकर्षक होईल. बड्या लोकांच्या भेटीगाठी होऊ शकतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात किंवा भागीदारीत आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले होऊ शकेल. प्रगती होऊ शकते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य