शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐन दिवाळीत शनी मार्गी: ‘हे’ उपाय करा; अपार यश, सुख-समृद्धी अन् धनलाभ मिळवा, शनी शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:14 AM

1 / 10
केवळ धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर ज्योतिषीय दृष्टिनेही ऑक्टोबर महिना विशेष मानला जात आहे. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रह राशीपरिवर्तन किंवा चलनबदल करणार आहेत. यापैकी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणर आहे. (saturn direct in capricorn 2022)
2 / 10
२३ ऑक्टोबर रोजी शनी मकर राशीत मार्गी होणार असून, यानंतर जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. जुलै महिन्यात शनी वक्री झाला होता. यानंतर आता शनी मकर राशीत मार्गी होत आहे. शनीचे मार्गी होणे शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवरही प्रभाव दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. (shani margi makar 2022)
3 / 10
ऐन दिवाळी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी शनी मार्गी होत असल्याने याचा विशेष प्रभाव काही राशींवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. शनीच्या मार्गी होण्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
4 / 10
शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमच्या हातून अनावश्यक खर्च होऊ शकतो किंवा कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. करिअरमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. यामुळे शनी मार्गी होण्याचा लाभ आणि प्रगती प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
5 / 10
शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करा. शनी देवाचे नामस्मरण, मंत्र म्हणणे उपयुक्त ठरू शकेल. यामुळे शनी साडेसाती, ढिय्या प्रभावामध्ये लाभ दिसून येऊ शकेल.
6 / 10
शक्य असल्यास शनिवारी काली मातेच्या मंदिरात लोखंडी त्रिशूळ दान करा. हे त्रिशूल शिव मंदिरात किंवा महाकाल भैरव किंवा महाकाली मंदिरात अर्पण करावे. शनी महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे महादेवांचे केलेले नामस्मरण लाभदायक ठरू शकते.
7 / 10
शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर, शनीचे मंत्र म्हणणे, नामस्मरण करणे तसेच दानधर्म करणे उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते.
8 / 10
शनी साडेसाती किंवा ढिय्या प्रभाव सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे.
9 / 10
हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
10 / 10
याशिवाय, शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणे, पिंपळाच्या झाडाचे पूजन, पिंपळाच्या झाडापाशी नियमितपणे दिवा लावणे, शनी संबंधित स्तोत्रे म्हणणे, असेही उपाय उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य