शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 1:36 PM

1 / 9
प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नवग्रह आणि १२ राशी, नक्षत्रांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील घडामोडीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सन २०२२ हे वर्ष शनीच्या राशीचक्रातील संचारासाठीचे महत्त्वाचे वर्ष मानले जात आहे. शनीचे चलन सर्व राशींवर प्रभाव पाडणारे ठरणारे आहे. (Shani Uday 2022)
2 / 9
जानेवारी महिन्यात सूर्याच्या प्रभावामुळे अस्त झालेला शनी आता फेब्रुवारी महिन्यात उदय होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सूर्य कुंभ राशीत प्रवेश करत असून, यानंतर शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत उदय होणार आहे. २२ जानेवारी २०२२ रोजी शनी मकर राशीत अस्त झाला होता. आता २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शनी उदय होणार आहे. (dhan devta kuber)
3 / 9
शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र मानले गेले असले, तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रहही मानले गेले आहेत. शनी उदय होणे ही एक खगोलीय घटना असली, तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. शनीच्या स्थितीबदलासह धनदेवता कुबेराचे शुभाशिर्वाद काही राशीच्या व्यक्तींना लाभू शकतात, असे मानले जात आहे.
4 / 9
ज्योतिषशास्त्रात शनी देवाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर इत्यादींचा कारक मानले जाते. शनी व्यक्तीला कष्टकरी, परिश्रमशील आणि न्यायी बनवतो. त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीला अनेकविध क्षेत्रात यश मिळते. याशिवाय, धनाची देवता कुबेर यांची विशेष कृपा होऊ शकते, असे सांगितले जाते.
5 / 9
शनी उदयाचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी ५ राशीच्या व्यक्तींना तो अत्यंत शुभफलदायक, राजयोग ठरू शकेल, या लोकांना या काळात व्यापार आणि राजकारणात विशेष यश मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.
6 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. या काळात अनेक स्रोतांमधून पैसे कमवण्याच्या संधी प्राप्त होऊ शकतील. उत्पन्न वाढण्याचे योग जुळून येतील. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. तेल, पेट्रोल, वाहतूक आणि लोखंडाशी संबंधित व्यवसाय, उद्योगातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. शनी उदय आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. यासोबतच धनाची देवता कुबेर यांची विशेष कृपा होऊ शकते.
7 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी फलदायी ठरू शकतो. कार्यालयात चांगली कामगिरी करू शकाल. सहकर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरदारवर्गाला बढतीचे योग जुळून येऊ शकतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल ठरू शकेल. नफा कमविण्याच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.
8 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना या कालावधीत नशीबाची उत्तम साथ लाभू शकेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळू शकतील. मिथुन राशीचा स्वामी बुध असून, शनी देव आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनीचा स्थितीबदल चांगला सिद्ध होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
9 / 9
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी धनलाभदायक ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकेल. गुंतवणुकीसाठी चांगला कालावधी असला, तरी तज्ज्ञ आणि ज्येष्ठ मंडळींच्या योग्य सल्ल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य