शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीचा राजयोग: ६ राशींवर अपार कृपा, व्यवसायात नफा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, उत्तम यश-प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 1:21 PM

1 / 10
ज्योतिषशास्त्रानुसार शनी नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह मानला गेला आहे. कर्मकारक असलेला शनी जसे कर्म कराल, तसे फल देतो, अशी मान्यता आहे. विद्यमान स्थितीत शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. यामुळे शश नामक राजयोग तयार झाला आहे.
2 / 10
शनी कुंभ राशीत असल्यामुळे आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. पुढील वर्षी शनीचे गोचर होणार आहे. शनीचे हे गोचर अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. शनी स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे.
3 / 10
शनीचे गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे शनीचा मीन राशीतील प्रवेश विशेष ठरणारा आहे. कुंभ राशीत असलेला शनी कोणत्या राशींना गोचर करण्यापूर्वी उत्तम लाभ, फायदा करून देऊ शकतो? ते जाणून घेऊया...
4 / 10
वृषभ: विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो. उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिक जीवनात यश मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणारे लोक यश मिळवू शकतात. कामामुळे प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात नवीन प्रयत्नातून नफा मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल.
5 / 10
सिंह: फायदा होऊ शकतो. व्यवसायात भरघोस लाभासोबत प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात करत असलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. याच्या मदतीने व्यवसाय वाढवू शकता. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज केला असेल तर यश मिळण्याची शक्यता आहे.
6 / 10
तूळ: शनीच्या कृपेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. विवाहेच्छुकांसाठी चांगले स्थळ येऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आगामी काळ अनुकूल ठरू शकतो. प्रमोशनसोबत चांगला पगार मिळू शकतो. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
7 / 10
धनु: यश आणि प्रगती होईल. काही काळापासून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या आता संपतील. परंतु, मुलांशी संबंधित समस्यांमुळे खूप चिंतेत असाल.
8 / 10
मकर: मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. संघर्षानंतर मिळालेल्या यशाने मन खूप आनंदी असेल. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. शुभ कार्यांत सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. वैवाहिक जीवनात अडथळे, समस्या दूर होतील.
9 / 10
कुंभ: अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. प्रतिष्ठा उजळेल. मान-सन्मान प्राप्त होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीत बढती आणि लाभाच्या संधी वाढतील.
10 / 10
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य