शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होलाष्टकात शनी उदय: ६ राशींना उत्तम, बँक बॅलन्स वाढेल; यश-प्रगतीची संधी, इच्छापूर्तीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:04 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला वेगळे स्थान आहे. शनी हा न्यायाधीश ग्रह मानला जातो. विद्यमान स्थितीत शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींचा साडेसाती काळ सुरू आहे.
2 / 9
एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवरून मार्गक्रमण करत असेल, तर तो पृथ्वीवरून दिसत नाही. या स्थितीला ग्रह अस्तंगत होणे असे म्हटले जाते. तर, सूर्यापासून ग्रह लांब गेला की, तो ग्रह पुन्हा दिसू लागतो, याला ग्रहाचा उदय म्हटले जाते. आताच्या घडीला सूर्य आणि शनी एकाच कुंभ राशीत असल्यामुळे शनी अस्तंगत आहे.
3 / 9
सूर्य आणि शनी एकमेकांपासून लांबच्या अंतरावर गेल्यामुळे शनीदर्शन होऊ शकेल, या अवस्थेला शनी उदय झाला असे म्हटले जाते. मार्च महिन्यात सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे शनी उदय होणार आहे. होळीपूर्वी होणारा शनीचा उदय काही राशींना उत्तम लाभदायक मानला जात आहे. जाणून घ्या...
4 / 9
मेष: करिअरमध्ये प्रगती होईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यावसायात यश मिळेल. प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. फायदा होईल आणि वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बढती मिळण्याची शक्यता आहे.
5 / 9
वृषभ: पद-प्रतिष्ठा वाढेल. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व प्रलंबित कामे पुन्हा पूर्ण होतील. मेहनतीला यश मिळेल. संपत्ती वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. आवडीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. वादांपासून दूर राहा.
6 / 9
सिंह: शनी उदय शुभ सिद्ध होऊ शकेल. भागीदारीच्या कामात चांगले लाभ मिळू शकतात. करिअरसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवन छान राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढेल. व्यवसायात लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. सर्व योजना यशस्वी होतील. दीर्घ नफा मिळेल. बँकेचे कर्ज मिळेल.
7 / 9
तूळ: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. यशासोबतच मान-सन्मान मिळेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. जोडीदारासोबत बराच वेळ घालवाल.
8 / 9
कुंभ: शनी उदय अनुकूल सिद्ध होऊ शकतो. मान-प्रतिष्ठा वाढेल. प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. बँक बॅलन्स वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. देश-विदेशात प्रवास करू शकता.
9 / 9
मीन: शनी उदय लाभदायक ठरू शकेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य