shani uday kumbha rashi 2023 these 5 zodiac signs may face problems of saturn rise in aquarius 2023
शनीचा कुंभ राशीत उदय: ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ, राहावे अखंड सावधान; काय करू नये? By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 1:35 PM1 / 10मार्च महिन्यात नवग्रहातील महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. यामध्ये मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य यांचा समावेश आहे. याशिवाय, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीचा आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत उदय होत आहे. शनी उदय काही राशींना अत्यंत लाभदायक ठरणार असेल, तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागेल. (shani uday kumbha rashi 2023)2 / 10यंदाच्या जानेवारी महिन्यात शनीने आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्या राशी आहेत. १७ जानेवारी रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. यानंतर अवघ्या १८ दिवसांनी शनी अस्तंगत झाला. आता ३१ दिवसांनंतर शनीचा उदय होत आहे. (saturn rise in aquarius 2023)3 / 10शनी सुमारे महिनाभर अस्तंगत आहे. ०६ मार्च रोजी अस्तंगत असलेल्या शनी कुंभ राशीत उदय होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाच्या या स्थितीला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होणे, असे म्हटले जाते.4 / 10तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. यानुसार, जवळच्या अंशांवर असलेले शनी आणि सूर्य आता एकमेकांपासून लांबच्या अंशांवर मार्गक्रमण करीत आहे. याचमुळे आता शनीचे पुन्हा एकदा पृथ्वीवरून दर्शन होणार आहे. यालाच शनीचा उदय असे म्हटले जात आहे.5 / 10शनीचा उदय होणे महत्त्वाचे मानले जात आहे. शनी अस्तंगत स्थितीत असताना प्रभावहीन असल्याचे सांगितले जाते. आता मात्र शनीचा प्रभाव पुन्हा एकदा सर्व राशींवर पाहायला मिळू शकणार आहे. यातील काही राशींना शनीच्या प्रतिकूल प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. आगामी काळात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो? ते जाणून घेऊया...6 / 10वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा उदय मध्यम फलदायी ठरू शकेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. हा कालावधी गुंतवणुकीसाठी अनुकूल नसल्याचे म्हटले जात आहे. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाच्या अभावामुळे काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. 7 / 10कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत अधिकार्यांचे सहकार्य मिळेल पण सहकार्यांमुळे अडचणी येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाद-विवादांपासून दूर राहावे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे हिताचे ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.8 / 10वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा उदय संमिश्र फलदायी असणार आहे. या काळात पालकांकडून सहकार्य मिळेल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. नशिबाची फारशी साथ न मिळाल्याने कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. भावंडांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेदामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 9 / 10मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय काहीसा संमिश्र ठरू शकतो. व्यावसायिक जीवनातील तणावामुळे कौटुंबिक वातावरण थोडे खराब होऊ शकते. कोणत्याही मालमत्तेबाबत भावंडांशी वाद होऊ शकतो. स्वत:ला शांत ठेवा आणि योग्य शब्द वापरून तुमचा मुद्दा एखाद्यासमोर मांडा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 10 / 10मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय संमिश्र ठरू शकतो. लव्ह लाइफ आणि वैवाहिक जीवनात गैरसमज वाढू शकतात. समजूतदारपणा दाखवणे हिताचे ठरू शकेल. कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications