शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani vakri 2022: शनी वक्रीचा परिणाम साडेसाती असलेल्या राशीबरोबर 'या' राशींनाही भोवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 1:32 PM

1 / 7
ज्योतिष शास्त्रात शनीला अतिशय महत्त्व आहे. हा ग्रह मंद चालीने चालणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. तसेच शनी देवतेला न्याय देवताही मानले जाते. त्यामुळे सगळे जण शनीला बाचकून राहतात. त्यांना टाळायचा प्रयत्न करतात. परंतु शनी देव आपल्या ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी जातात आणि संबंधित राशीतील जातकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.
2 / 7
५ जून रोजी शनी कुंभेतच वक्र झाल्यामुळे अन्य राशींवर काय प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊ. आधीच साडेसाती त्यात शनीची वक्र चाल यामुळे लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यावरही उपाय जाणून घेऊ.
3 / 7
मकर राशीच्या लोकांवर शनीच्या पूर्ण प्रभाव राहील. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. शनीच्या प्रतिगामी अवस्थेत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. शनिवारी मारुती स्तोत्राचे पठण केल्यास फायदा होईल.
4 / 7
शनिदेव तुमच्या राशीत विराजमान असून तुमच्या राशीत प्रतिगामी वाटचाल करतील. त्यामुळे शनीची उलटी हालचाल तुमच्यावर सर्वाधिक परिणाम करेल. पैशाच्या बाबतीत संयम बाळगावा लागेल. शनिवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. आर्थिक अडचणीमुळे दानधर्म शक्य नसेल तर ज्येष्ठांची सेवा, मदत करता येईल.
5 / 7
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचा पहिला चरण सुरू आहे. अशा स्थितीत प्रतिगामी शनि तुमच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण करू शकतो. अनावश्यक खर्चामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळण्यासाठी जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. शनिवारी शनि चालिसाचे पठण करणे लाभदायक ठरेल. या तीन राशींबरोबर पुढील दोन राशींनी काळजी घ्यावी.
6 / 7
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिची वक्रदृष्टी सुरू आहे. या काळात कर्क राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैसा आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये विशेष काळजी घ्यावी. शनिवारी शनिशी संबंधित वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल. तसेच शनी मंत्राचा जप करावा.
7 / 7
प्रतिगामी अवस्थेतील शनि तुमच्या स्वभावावर परिणाम करू शकतो. तुम्ही क्रोध आणि अहंकाराचे बळी होऊ शकता. त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. शनिवारी हनुमानाची पूजा केल्यास लाभ होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष