शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Vakri 2023: १७ जूनपासून शनी बरोबर राहू केतू येणार तुमच्या राशीला; पुढील सहा महिने धोक्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:46 AM

1 / 5
शनिवार १७ जून रोजी शनीची रास बदलत आहे. शनि महाराज आता आपल्या गृहस्थानी अर्थात कुंभ राशीत पुढील ६ महिने जाणार आहेत. अशा स्थितीत शनि सोबत आणखी राहू केतूदेखील ऑक्टोबर महिन्यापर्यंत वक्री चालतील. त्यामुळे तिन्ही ग्रहांची वक्री चाल सहा महिने परिणामकारक राहील. ग्रहांच्या या वक्र चालीमुळे जून ते नोव्हेंबर या काळात सिंह राशीसह ४ राशींना आर्थिक, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शनि, राहू आणि केतू मिळून या राशींसाठी त्रासदायक ठरणार आहेत.
2 / 5
शनिसोबत राहु केतूच्या स्थलांतरामुळे कर्क राशीच्या लोकांना पुढील ६ महिने करिअरबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. कर्क राशीसाठी राहू, केतू आणि शनि प्रतिगामी असल्याने आर्थिक बाबतीत त्रास होऊ शकतो. अचानक खर्चात वाढ होईल. खर्च हाताबाहेर गेले असता कर्जाचा डोंगर साचू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. नोकरीतील गोंधळ आणि तणाव वाढल्याने राग आणि चिडचिड वाढेल. जोडीदाराच्या तब्येतीमुळे किंवा त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कौटुंबिक जीवनात वेळोवेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही कौटुंबिक समस्येमुळे तुम्हाला मनाविरुद्ध ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो.
3 / 5
जूनच्या मध्यापासून शनी, राहू आणि केतूचे पूर्वगामी गतीतील संक्रमण सिंह राशीसाठी प्रतिकूल ठरेल. तुमच्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्यास तुम्ही निराश होऊ शकता. नोकरीमध्ये तुमची रुची राहणार नाही आणि नवीन नोकरीसाठी मनात उलथापालथ होईल, पण या दरम्यान तुम्ही कुठेही जाल तरी तुम्हाला मानसिक शांती मिळणार नाही, त्यामुळे विचार करूनच मोठा निर्णय घ्या. व्यवसायात मिळालेला पैसा अडकू शकतो. कोणत्याही कायदेशीर समस्या किंवा तांत्रिक कारणामुळे तुम्ही तणावग्रस्त व्हाल. दरम्यान, नवीन क्षेत्रात धोका पत्करणे टाळा. महत्त्वाच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्यांचा रोष आणि नाराजीला सामोरे जावे लागू शकते.
4 / 5
वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढील ६ महिने शनीच्या प्रतिगामी संक्रमणादरम्यान अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या दरम्यान राहू, केतू सोबत शनी तुम्हाला कौटुंबिक तसेच करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये अडकवणार आहे. या काळात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात आर्थिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचे त्यांच्या भागीदारांशी मतभेद होऊ शकतात. योग्य कागदपत्रांशिवाय कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. या दिवसांमध्ये, अनावश्यक खर्च झाल्यामुळे आर्थिक बाजू ढासळू शकते. त्याचा परिणाम सेव्हिंग वर होऊ शकेल. नात्यातील अंतर वाढल्याने मानसिक त्रास होऊ शकतो.
5 / 5
मीन राशीचे लोक सध्या साडेसातीच्या पहिल्या चरणातून जात आहेत आणि राहू आणि केतूसह शनीचे प्रतिगामी संक्रमण मीन राशीच्या लोकांना मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धेकडे झुकू शकता आणि तुमच्या वागण्यात कटुताही दिसून येईल. स्वभावातील बदलामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात तसेच कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. वाद आणि जोडीदारासोबत समन्वयाच्या अभावामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. तुमचे पैसे आरोग्याशी संबंधित कारणांवरही खर्च होतील. एखादी जुनी समस्या पुन्हा डोके वर काढेल. यावेळी तुम्हाला दृढता आणि संयमाने नातेसंबंध घट्ट धरून तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणेच फायद्याचे ठरेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य