Shravan 2022: Wear Rudraksh Mala for spiritual advancement, but only with astrologer's advice!
Shravan 2022: अध्यात्मिक उन्नतीसाठी रुद्राक्ष माळा घाला, पण ज्योतिषांचा सल्ला घेऊनच! By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 4:41 PM1 / 5म्हणून, रुद्राक्षच्या माळेचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. ती माळ कोणी घालावी आणि कोणी घालू नये, याबद्दल ज्योतिषशास्त्राचे नियम आहेत. त्या नियमांचे पालन न करता रुद्राक्षाची माळ वापरणाऱ्या व्यक्तीला विपरित परिणाम सहन करावे लागतात. काय आहेत ते नियम, जाणून घेऊया.2 / 5रुद्राक्ष ही भारतात नेपाळ इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांपासून जपमाळ बनवितात. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत. ज्याप्रमाणे वनस्पतींपासून बनवलेली जडीबुटी प्रत्येकाला लागू पडतेच असे नाही, त्याप्रमाणे रुद्राक्ष नामक वनस्पती हर तऱ्हेच्या व्यक्तीला फलदायक ठरेलच असे नाही. म्हणून ज्योतिषशास्त्राचे नियम वाचून संबंधित व्यक्तींनीच रुद्राध धारण केला पाहिजे.3 / 5गळ्यात आणि हातात जो दागिना, हार घालतात, तो विचारपूर्वक घातला पाहिजे. कारण, आपल्या पूर्वजांनी दागिन्यांची रचना केवळ अलंकार म्हणून केलेली नाही, तर दागिन्यांचा आपल्या शरीरावर होणारा प्रभाव लक्षात घेऊन शास्त्रशुद्धपणे त्यांची आखणी केली आहे. गळ्यात आणि हातात घातल्या जाणाऱ्या दागिन्यांचा प्रभाव थेट मेंदूवर पडतो. तसेच, रक्तदाबावरही परिणाम होतो. म्हणून ज्यांना रुद्राक्ष वापरण्याची अनुमती किंवा गरज नाही, अशा लोकांनी केवळ अलंकार म्हणून गळ्यात किंवा हातात रुद्राक्षाची माळ, ब्रेसलेट धारण केले असता, रक्तदाब कमी होतो. अस्वस्थता वाढत जाते, परंतु रुद्राक्ष त्याला कारणीभूत असेल, हे वापरणाऱ्या व्यक्तीला लक्षातही येत नाही. म्हणून ज्योतिषांचा सल्ला घेतल्याशिवाय रुद्राक्ष वापरू नये.4 / 5मनगट आणि हाताची बोटे यांचा संपर्क थेट हृदयाशी आहे. म्हणून साखरपुड्यात अनामिकेत अंगठी घालून दोन हृदयांची परस्परांशी गाठ पडावी, अशी संकेत आहेत. तसेच बहिण आपल्या भावाला राखी मनगटावर बांधते. ऋणानुबंधांचे धागे घट्ट जोडले जावेत आणि परस्परांबद्दल प्रेम कायमस्वरूपी राहावे, यासाठी हा प्रेमाचा धागा मनगटाशी जोेडला आहे. लग्नात वधू वर कांकण बांधतात, तेही मनगटावर. याचाच अर्थ जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक या प्रथांची निर्मिती केली गेली आहे. त्यामागील शास्त्र समजून न घेता, केवळ गंमत म्हणून आपण प्रयोग केले, तर विपरित प्रकार घडू शकतात.5 / 5रुद्राक्षाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे. मांसाहार व मद्यपान करणाऱ्यांनी रुद्राक्षाला हात न लावणे इष्ट. रुद्राक्ष सर्वकल्याणकारी, मांगल्य देणारा आणि आयुष्यवर्धक आहे. म्हणून ते धारण करताना विंâवा देवघरात ठेवताना आपल्याकडून पावित्र्य जपले जाणार आहे का, याचा सर्वतोपरी विचार करावा. संसारसुखाची अपेक्षा करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. कारण, तो विरक्तीचे प्रतीक आहे. ज्यांना आध्यात्मिक मार्गात उन्नती करायची आहे, त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार रुद्राक्ष धारण करावा. संसारी व्यक्तीने रुद्राची जपमाळ ओढली तर चालते, परंतु गळ्यात घालू नये. आणखी वाचा Subscribe to Notifications