शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shravan 2024: यंदाचा श्रावण ठरणार खास, अमृत सिद्धी, रवी योगासहित बारा राशींसाठी नऊ शुभ योगांचा संयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:00 PM

1 / 5
यंदा ५ ऑगस्ट रोजी श्रावण (Shravan 2024) सुरु होणार असून ३१ ऑगस्ट रोजी तो संपणार आहे. या कालावधीत चार श्रावणी सोमवार येतील, तसेच मंगळागौरीच्या व्रतासाठी चार मंगळवारही मिळतील. त्यांच्या तारखा आणि जु१ळून आलेला शुभयोग कोणती फलप्राप्ती करून देणार ते पाहूया.
2 / 5
यावेळी श्रावणात ५, १२, १९, २६ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार येणार आहेत, तर ६,१३, २०, २७ ऑगस्ट रोजी मंगळागौरी देवीचे पूजन केले जाईल. तसेच ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी, ताठ १९ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा आहे. श्रावण मासातले मुख्य आकर्षण म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा सोहळा २६ ऑगस्ट रोजी आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी गोपाळकाला, दहीहंडी उतवस साजरा होईल. त्याबरोबरच जुळून आलेले शुभ योग जाणून घेऊ.
3 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार यंदा एक सोडून नऊ शुभ संयोग जुळून येणार आहेत. राजयोग, कुमार योग, दुग्ध योग, अमृत सिद्धि योग, व्रज मूसल योग, स्थिर योग, रवि योग, राजयोग आणि सिद्धि योग जुळून आल्याने या काळात केलेलया उपासनेचे निश्चित रूपाने फळ मिळणार असे ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे.
4 / 5
या महिन्यात मंगळ रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. बृहस्पति सुद्धा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र मघा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. १६ जुलै रोजी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करेल आणि शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. या स्थलांतराचे १२ ही राशींना उत्तम फळ मिळणार आहे, त्यासाठी उपासना उत्तम हवी असे म्हटले आहे.
5 / 5
श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. ही पूजा केवळ वाचिक नाही तर शारीरिक आणि मानसिक पण असायला हवी. त्यासाठी उपासनेचे बळ असायला हवी. ती कशी करायची? तर, संबंध महिनाभर दिवस भरातील एकच वेळ, एकच जागा निवडून शिवकथा, लीला, अमृत अमृत किंवा शिव महापुराण, शिव स्तोत्र पठण, शिवकवच किंवा महामृत्युंजय यापैकी कोणत्याही एका स्तोत्राचे पठण करावे. तस केल्याने मन, बुद्धी आणि शरीरातील रोग व दोष दूर होतात. व्यक्तीला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य