शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रावण पौर्णिमा: अतिगंड योगात ५ राशींना लक्ष्मी वरदान; सुख-सौभाग्य-समृद्धी, धनलाभ वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 8:41 AM

1 / 9
श्रावणी बुधवारी ३० ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा प्रारंभ होत आहे. श्रावणी गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत श्रावण पौर्णिमा आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये पौर्णिमेचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन असे दोन सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात.
2 / 9
बुधवार हा बुद्धीची देवता गणपती बाप्पा आणि नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाला तर गुरुवार नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह आणि दत्तगुरुंना समर्पित असल्याची मान्यता आहे. श्रावण पौर्णिमेला अतिगंड योग आणि धनिष्ठ नक्षत्राचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येईल, असे सांगितले जात आहे.
3 / 9
पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य वाढते. ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे काही राशींवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहू शकेल. ५ राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग सुकर होऊ शकतील. नशीबही साथ देईल, असे सांगितले जात आहे.
4 / 9
श्रावण पौर्णिमेला काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होईल, कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होईल आणि लक्ष्मीची देवीचे अपार शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींना श्रावण पौर्णिमेचा शुभ-लाभ मिळेल? जाणून घेऊया...
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण पौर्णिमा शुभ फलदायी ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. भाग्य साथ देईल.चंद्राचा शुभ प्रभाव राहील. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे अधिकार वाढतील. मोठे पदही मिळू शकेल. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. अनेक कामे पूर्ण होऊ शकतील. मनोकामना पूर्ण करण्यासाठी सात बुधवार गणपती बाप्पाला मूगाचे लाडू अर्पण करावे.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी कृपेने भाग्याची भक्कम साथ मिळू शकेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. आर्थिक सुबत्तेचा शुभ संयोग घडेल. व्यवसाय करणाऱ्यांना शुभ काळ राहील. नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करायची असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. रक्षाबंधनाच्या सणासाठी मुलांसोबत खरेदीही करू शकता. कुटुंबीयांसह सहलीला जाण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्या दाखवावा. तसेच कच्चे दूध पाण्यात मिसळून पिंपळाच्या झाडावर अर्पण करून ११ वेळा प्रदक्षिणा घालावी.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींवर श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहू शकेल. प्रगतीचे मार्ग सुकर होतील. व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि लेखन योग्य दिशेने होईल. रक्षाबंधनाच्या सणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतील. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. मनावरील ओझे हलके होईल. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळावी, यासाठी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण पौर्णिमा शुभ ठरू शकेल. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. चांगली बातमी मिळेल. समाजात सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवू शकाल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात उंची गाठाल. नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. देवी लक्ष्मीला हळद मिसळून ११ कवड्यांची माळ अर्पण करा. लक्ष्मी देवीचे विधिवत पूजन करावे.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींवर श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी देवीची शुभ कृपा राहू शकेल. लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. नवीन मित्र होऊ शकतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. विशिष्ट संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकेल. लक्ष्मीच्या कृपेने अडकलेला पैसा मिळेल. धनवृद्धीचा शुभ संयोग घडेल. देवी लक्ष्मीला अत्तर, सुगंधित अगरबत्ती आणि लाल फुले अर्पण करावी. शक्य असल्यास कनकधारा स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य