शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी पुरणाच्या दिव्यांनी करा जिवती मातेची आरती; सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 6:08 PM

1 / 5
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस 'सवाष्ण करणे' म्हणतात.
2 / 5
श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर, चणे-फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी मूठभर पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारे पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.
3 / 5
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा करावी. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.
4 / 5
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे वस्त्र, गंध, हळद-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
5 / 5
पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल