शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रावणी शनिवार: ५ राशींना भाग्योदयाचा लाभ, शनी-हनुमंतांचा वरदहस्त; विष्कुंभ योग शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 7:07 AM

1 / 9
२६ ऑगस्ट २०२३ रोजी दुसरा श्रावणी शनिवार आहे. श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती व्रतपूजन केले जाते. शनिवार हा बजरंगबली हनुमान आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी देव यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते.
2 / 9
दुसऱ्या श्रावणी शनिवारी मूळ नक्षत्र आणि विष्कुंभ योगाचा शुभ संयोग जुळून येत आहे. याचा काही राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. धनलाभासह अनेकविध संधी प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे.
3 / 9
एकूण ग्रहस्थिती ५ राशींसाठी अतिशय लकी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. समस्यातून दिलासा, यश-प्रगतीच्या संधी आणि शनी देव तसेच हनुमानाची कृपा या राशींना मिळू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शनिवार सकारात्मक ठरू शकेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकाल. धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नोकरदार वर्गातील लोक काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी दिवस खूप चांगला आहे. तसेच नोकरदार लोकांसाठी खूप फलदायी ठरेल.
5 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शनिवार अनुकूल ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. जर तुम्हाला एखाद्यासोबत पैशांचा व्यवहार करायचा असेल तर करू शकता. पात्र लोकांकडून चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात एखादी ओळखीची व्यक्ती भेटेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल.
6 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शनिवार उत्तम ठरू शकेल. लोकांकडून कामे सहज करून घेऊ शकाल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये संतुलन राखावे लागेल.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शनिवार शानदार ठरू शकेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. सर्व कामे एकामागून एक यशस्वी होतील. आयुष्यात काही समस्या येत असतील तर घरातील सदस्यांची साथ मिळेल. यासोबतच कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपू शकेल.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शनिवार चांगला ठरू शकेल. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. ज्यामुळे खूप आनंदी व्हाल. कोणत्याही जुन्या समस्येवर उपाय मिळू शकेल. ज्या समस्यांमुळे बराच काळ तणावाखाली होता त्या सर्व संपू शकतील. खूप दिलासा आणि आराम वाटेल.
9 / 9
शनी साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असलेल्यांनी शनिवारी शनी देवासह हनुमंतांचे पूजन, नामस्मरण, मंत्र पठण करणे उपयुक्त मानले गेले आहे. यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य