शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 9:23 AM

1 / 9
०६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी झाल्यानंतर आता ०७ तारखेला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रावण कृष्ण नवमीला दहिकाला असतो.
2 / 9
मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. श्रावणी गुरुवारी दहीहंडी साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे गुरुवार हा श्रीहरि विष्णूंना समर्पित असल्याचे मानले जाते.
3 / 9
श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार असल्याचे मानले जाते. त्यामुळे श्रावणी गुरुवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. श्रावणी गुरुवारी चंद्र वृषभ राशीत असणार आहे. यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच या दिवशी रोहिणी आणि त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र असेल.
4 / 9
ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगांमुळे पाच राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा राहणार आहे. या राशींच्या प्रगतीचा शुभ संयोग घडेल. कान्हाच्या आशीर्वादाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. गुरुवार हा गुरु ग्रहला समर्पित असल्याने काही ज्योतिषीय उपाय केल्यास कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना दहिकाला शुभ ठरू शकेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. घरात धार्मिक वातावरण राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये समाधानकारक गोष्टी घडू शकतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यात यश मिळेल. श्रीकृष्णाचे पूजन, नामस्मरण तसेच गुरु ग्रहांच्या मंत्राचा जप करणे हिताचे ठरू शकेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना दहिकाला सुखद ठरू शकेल. संपत्ती वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायातील भागीदारीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने पैसे कमविण्यात आणि बचत करण्यात यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुपाचा दिवा लावावा.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना दहिकाला लाभदायी ठरू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कोणतीही योजना करत असाल तर अंमलबजावणीसाठी चांगला काळ असेल. विद्यार्थी शिक्षणात चांगली कामगिरी करतील. शिक्षक आणि वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनात सुख-शांती येण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेटी दिल्याने मन प्रसन्न होईल. यथाशक्ती दान-धर्म करावा.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना दहिकाला शुभ फलदायी ठरू शकेल. उर्जेने परिपूर्ण दिवस असेल. चमकदार कामगिरी कराल. नोकरदारांच्या मेहनतीची आणि कौशल्याची बॉस प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी दर्जाही वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर शुभ काळ असेल. भावंडांच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल. नाते दृढ राहील. लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण, मंत्रजप करणे उपयुक्त ठरू शकेल.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना दहिकाला अनुकूल ठरू शकेल. बऱ्याच काळापासून विचार केलेले काम पूर्ण होईल. उत्साहित व्हाल. कुटुंबात सुख-शांततेते वातावरण राहील. वडिलधाऱ्यांच्या मदतीने जुनी समस्याही संपुष्टात येऊ शकेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून कठोर परिश्रम केल्यास परीक्षेत उत्कृष्ट यश मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा. दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा आणि दान करा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य