shukra and shani samsaptak yoga 2024 these 6 zodiac signs get success positive impact
शुक्र-शनीचा समसप्तक योग: ६ राशींना शुभ लाभ, व्यापारात नवी डील; येणी वसूल होतील, वरदान काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 9:46 AM1 / 9ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह सिंह राशीत आहे. या राशीत बुध ग्रहही आहे. पण बुध वक्री आहे. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास आहे. शुक्राच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे केंद्र त्रिकोण आणि समसप्तक योग जुळून येत आहे.2 / 9नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे. शुक्र सिंह राशीत आल्याने शनीशी समसप्तक योग जुळून आलेला आहे. म्हणजेच शुक्र आणि शनी एकमेकांसमोर सातव्या स्थानी आहेत. शुक्र आणि शनीचा हा समसप्तक योग विशेष मानला जात आहे.3 / 9शुक्र आणि शनी यांच्या समसप्तक योगाचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. शिक्षण, नोकरी, कुटुंब, गुंतवणूक, आर्थिक आघाडी या क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम, अनुकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 9मेष: केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोग फायदेशीर ठरू शकतात. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी काळ असू शकेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. लोकप्रिय व्हाल. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. या कालावधीत गुंतवलेले पैसे भविष्यात आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.5 / 9वृषभ: शुक्र आणि शनी समसप्तक योगाचे शुभ परिणाम मिळू शकतात. पूर्वी गुंतवणूक केली असेल तर या काळात नफा मिळू शकतो. या काळात पैसे गुंतवणे अनुकूल ठरेल. व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होऊ शकतील. व्यवसायात विस्तार शक्य आहे. कुटुंबातील कोणतीही मोठी जबाबदारी स्वतःच्या बळावर पार पाडू शकता. जमीन, मालमत्ता किंवा वाहनाचे सुख मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही दूर होऊ शकतात.6 / 9मिथुन: समसप्तक योग शुभ सिद्ध होऊ शकेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. समाजात आदर वाढेल. नोकरदारांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. संयम आणि सभ्यतेने काम केले तर शनी कृपेने मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. कौटुंबिक आनंदात वाढ दिसून येईल.7 / 9तूळ: विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्यांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. पैशाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्याला काही उधार दिले असेल तर ते परत मिळू शकते. मोठ्या भावा-बहिणींकडून आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. जे लोक इतरांवर अवलंबून आहेत त्यांना उत्पन्नाचे साधन मिळू शकते.8 / 9धनु: समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांना मोठी डील मिळू शकते. ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मान-सन्मान मिळेल. नशिबाची साथ लाभेल. प्रलंबित कामे होऊ शकतात. नोकरदार आणि व्यावसायिकांना कमी कष्टाने अधिक लाभ मिळतील. भौतिक सुख मिळू शकते.9 / 9मकर: समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाल्याने चांगले दिवस सुरू होऊ शकतात. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. कार्यशैली सुधारेल. व्यवसाय वाढवण्यासाठी जितका पैसा खर्च करतात, तो लवकरच दुपटीने परत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications