शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shukra Gochar 2022: २२ जानेवारीपर्यंत 'या' राशींची पाचही बोटं तुपात ठेवणारी ग्रहस्थिती; वर्षाच्या सुरुवातीला मजाच मजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 2:45 PM

1 / 6
२९ डिसेंबरला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामध्ये शनीच्या व्यतिरिक्त शुक्राचा सूर्याशी संयोग होईल. शुक्र २२ जानेवारी २०२३पर्यंत मकर राशीत राहील. शुक्राचे हे संक्रमण काही राशींसाठी हानिकारक तर काही राशींसाठी लाभदायक ठरेल. चला तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी, ज्यांच्या वाट्याला येत्या काळात यश, पैसा, समृद्धी सारे काही येण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रयत्न करत राहा आणि लाभ घेत राहा.
2 / 6
शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना पैसे कमावण्याच्या अनेक संधी येतील. नोकरदार लोकांनाही पगारवाढ तसेच पदोन्नती संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणार्‍यांसाठी देखील हा एक चांगला काळ आहे. उत्पन्न वाढेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. रोज 'ओम शुक्राय नमः' चा जप सुरू करा.
3 / 6
या राशीच्या लोकांचा कल धार्मिक कार्याकडे असेल, त्यामुळे मनःशांती लाभेल तसेच नवीन ओळखीतून उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. या काळात धार्मिक स्थळी जाल. कुटुंबाशी सलोखा वाढेल. लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र किंवा जप नित्यनेमाने सुरू करा.
4 / 6
तूळ राशीसाठी हे संक्रमण शुभ ठरणार आहे. त्यांच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि करिअरमध्येही सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्ही येत्या वर्षी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. पूर्ण विचारांती निर्णय घ्या. फायद्यात राहाल. नवीन संधी देखील दार ठोठावू शकते. जोडीदाराशी असलेल्या नात्यात गोडवा राटिकेल, वाढेल आणि व्यवसायात घेतलेले नवे निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील.
5 / 6
शुक्र मकर राशीतच प्रवेश करणार आहे, तसेच काही काळ मुक्कामी असणार आहे. त्यामुळे मकर राशीसाठी आर्थिक स्थिती उत्तम असेल आणि करिअरमध्ये चांगले यश संपादन कराल. जानेवारीमध्ये आवडत्या ठिकाणी सहलीचे आयोजन करू शकता. फक्त आनंदाच्या भरात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. या काळात तब्येतही सुधारेल आणि जुन्या शारीरिक समस्या दूर होतील. देवीची उपासना फलदायी ठरेल.
6 / 6
शुक्राच्या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांना साडेसाती असूनही काही काळ आनंददायी ठरणार आहे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांचे त्यांच्या भागीदारांसोबतचे संबंध सुधारतील. आरोग्यही चांगले राहील.दत्ताची उपासना करावी तसेच शनी स्तोत्र पठण सुरू ठेवावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष