शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shukra Gochar 2022: शुक्रदेव २७ फेब्रुवारीला करणार मकरेत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:34 IST

1 / 6
Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडतो. शुक्र ग्रह हा धन, वैभव आणि संपत्तीचा कारक मानला जातो. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा शासक ग्रह आहे.
2 / 6
कुंडलीत शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीत असेल तर या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होते. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत २३ दिवस गोचर करतो. आता २७ फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशीत बदलामुळे काही राशींच्या लोकांचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे.
3 / 6
शुक्र हा दशम स्थानात गोचर करेल. या दरम्यान तुम्हाला नोकरीच्या ऑफर मिळतील. व्यापाऱ्यांना धनलाभ होईल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते.
4 / 6
शुक्र हा नवव्या स्थानात शुक्राचं गोचर होईल. या काळात भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.
5 / 6
शुक्राच्या गोचरामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. तब्येत सुधारेल. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला पुन्हा मिळू शकतात. प्रेमसंबंध मजबूत होतील. तुम्हाला भाग्याचीही साथ मिळेल.
6 / 6
शुक्र मीन राशीच्या अकराव्या स्थानात गोचर करेल. काही शुभ कार्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य भेटायला येऊ शकतात. कामाची परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. टीप : कोणतंही कार्य करण्यापूर्वी तज्जांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष