शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shukra Gochar 2023: शुक्राचं वृषभ राशीत गोचर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या सहा राशींचे ‘अच्छे दिन’, कमाई वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:11 PM

1 / 8
गुरुवार, ६ एप्रिल रोजी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र हा भौतिक सुख, प्रेम, सौंदर्य इत्यादींचा कारक ग्रह आहे. कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असेल तर जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि नशिबाचे दरवाजे उघडतात असं म्हटलं जातं.
2 / 8
याउलट कुंडलीत शुक्र चांगला नसेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं म्हणतात. जेव्हा शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा प्रभाव देश, जग, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक स्थिती यासह सर्व १२ राशींवर पडतो. शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करताना कोणत्या राशीच्या लोकांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील हे जाणून घेऊया.
3 / 8
मेष - या काळात कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुमची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल आणि कामाच्या संदर्भात प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. या काळात धनलाभाचेही योग संभवतात आणि गुंतवणुकीतून चांगला नफाही होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याचाही बेत आखू शकता.
4 / 8
वृषभ - या काळात नोकरदार लोकांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळू शकेल आणि त्यांच्या मदतीनं अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात नशिबाची साथ मिळाल्यानं व्यवसायात भरपूर नफा होण्याची शक्यता आहे.
5 / 8
कर्क - हा काळ तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकता. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी आणि व्यावसायिक लोकांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढू शकतो. तुम्हाला परदेशात जाऊन व्यवसाय करण्याची संधीही मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.
6 / 8
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यातही यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे आणि पदोन्नतीही मिळू शकते. कामात भावंडांचे सहकार्य लाभेल आणि त्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. या कालावधीत तुम्ही नवं वाहन किंवा घर खरेदी करू शकता.
7 / 8
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा कालावधी शुभ आणि फलदायी राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान नोकरदार लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि पदोन्नती देखील होऊ शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकतं. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरू शकतो. मकर राशीच्या लोकांना प्रेम प्रकरणातही यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ फायदेशीर ठरू शकतो आणि त्यांचा प्रभावही वाढण्याची शक्यता आहे.
8 / 8
कुंभ - या कालावधीत कुंभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. या कालावधीत परदेशवारीचेही योग संभवतात. कौटुंबीक जीवनातील समस्या दूर होण्याची शक्यता आहे. तसंच आपल्या मुलांसोबतही तुम्ही वेळ घालवू शकाल. या कालावधीत व्यवसायात अनुकूल परिणाम मिळू शकतात. मुलांच्या प्रगतीनं तुमचं मनही आनंदी राहू शकतं.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य