शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मी नारायण योग: शुक्र गोचराचा ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; कमाई वाढेल, भाग्याची साथ मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 3:11 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र डिसेंबर महिन्यात राशीपरिवर्तन करत आहे. शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत विराजमान होत आहे. (shukra gochar dhanu rashi december 2022)
2 / 9
शुक्र ग्रह ५ डिसेंबर रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करत आहे. २९ डिसेंबरपर्यंत शुक्र धनु राशीत विराजमान असेल. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह धनु राशीत विराजमान झाला आहे. बुध आणि शुक्र युतीने लक्ष्मी नारायण नामक शुभ योग जुळून येत आहे. (venus transit in sagittarius december 2022)
3 / 9
या योगाच्या शुभ प्रभावामुळे डिसेंबर महिन्यात मेष राशीसह ५ राशींचे उत्पन्न वाढेल, नोकरीतही प्रगती होईल, असे सांगितले जात आहे. धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांची युती ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. (lakshmi narayan yoga 2022)
4 / 9
या योगाच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांनाही डिसेंबर महिन्यात साडेसाती सुरु असतानाही लाभ मिळू शकेल. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुक्रच्या धनु प्रवेशाचा उत्तम लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्रचा धनु प्रवेश लाभदायक ठरू शकेल. नशिबाची जबरदस्त साथ मिळेल. धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रयत्नात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या कामाचा फायदाही मिळेल. मित्राकडून सहकार्य मिळू शकते. मुलांकडून आनंद मिळेल. शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आगामी काळ शुभ राहील.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा धनु प्रवेश यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेचा लाभ मिळेल. सहकारी आणि भागीदारांचे सहकार्य मिळेल. मानसिक दडपणातूनही आराम मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन काही प्रमाणात यशस्वी होईल. शुभ कामांवर आणि काही घरगुती गरजांमुळे खर्च वाढेल. जोडीदाराच्या सहकार्यामुळे मानसिकदृष्ट्या खंबीर बनू शकाल.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्रचा धनु प्रवेश शुभ ठरू शकेल. तुमची क्षमता आणि योग्यता दाखवण्याची संधी मिळेल. कार्यक्षमतेमुळे लाभ मिळू शकतो. हॉटेल, प्रवास, प्रशासकीय क्षेत्र, संरक्षण क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरेल. आर्थिक बाबतीत भाग्य तुम्हाला साथ देईल. कमाई वाढेल. मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील.
8 / 9
धनु राशीत शुक्र विराजमान होत आहे. धनु राशीची साडेसाती असली, तरी लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद या काळात प्राप्त होऊ शकतील. कमाई वाढेल. भविष्यासाठी नियोजन करू शकता. गुंतवणूक करू शकता. कामाच्या ठिकाणी महत्त्व आणि प्रभाव वाढेल. व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्यांना पात्रतेचा पूर्ण लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनही सुखकर राहील. प्रवास फायदेशीर आणि आनंददायक ठरू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. संशोधन कार्यात व्यस्त असलेल्यांनाही यश मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली राहील. पद, प्रभाव आणि प्रतिष्ठा यांचा लाभ मिळेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळू शकते. अधिकारी वर्गाशी संबंध वाढतील. राजकारण आणि सामाजिक कार्याशी संबंधितांना यश मिळू शकेल. आर्थिक बाबतीतही लाभ होईल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. येणी प्राप्त होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य