शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना उत्तम लाभ, धनवृद्धी योग; गोड बातमी मिळेल, होळी शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 1:56 PM

1 / 9
आताच्या घडीला गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान असलेला शुक्र ग्रह होळीनंतर मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. १२ मार्च रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. एप्रिल महिन्यात शुक्र स्वराशीत प्रवेश करणार आहे. (shukra gochar mesh rashi 2023)
2 / 9
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्राचा मेष राशीत विराजमान असलेल्या तसेच छाया, क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहुसोबत युती योग जुळून येईल. मीन ही शुक्राची उच्च रास मानली गेली आहे. (venus transit in aries 2023)
3 / 9
होळीनंतर होत असलेल्या शुक्राच्या या राशीपरिवर्तनाचा काही राशीच्या व्यक्तींना अपार लाभ मिळू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल शुक्राचा मेष प्रवेश, कोणत्या राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, आर्थिक आघाडी, प्रेमसंबंध यात फायदा मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीत शुक्राचा प्रवेश होत आहे. या राशीच्या व्यक्तींना हा आगामी काळ चांगला ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. लव्ह लाईफ चांगली असणार आहे. विवाहितांना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश लाभदायक ठरू शकेल. अनेक नवीन लोकांशी संपर्क होईल. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हे संक्रमण खूप चांगले होईल.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश लाभदायक ठरु शकेल. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी खूप चांगला असेल. या काळात तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ छान असेल. चांगली बातमी मिळू शकते. जुना वाद आगामी काळात मिटू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवू शकाल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते.
8 / 9
मीन राशीतून शुक्र मेष राशीत प्रवेश करत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. पैसे वाचवू शकाल. सासरच्या मंडळींशी तुमचे संबंध खूप चांगले राहतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतील. तुमचा लोकांवर प्रभाव राहू शकेल.
9 / 9
शुक्राचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी तसेच प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी दररोज सकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा. शुक्रवारी नियमित व्रत करावे. एखाद्या ज्योतिषाचा सल्लाने हिरा किंवा ओपल, शुक्राचे रत्न धारण करू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य