शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:17 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आगामी काळ काहीसा महत्त्वाचा ठरू शकेल. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ राशीपरिवर्तन करणार आहे. तसेच कुंभ राशीतील शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या युतीने महालक्ष्मी योग जुळून येणार आहे.
2 / 9
कुंभ राशीत शनी, शुक्र आणि मंगळ यांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. आगामी काळ काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मंगळ आणि शुक्र यांचे महत्त्व वेगळे असून, यांचा प्रभाव विशेष मानला जातो.
3 / 9
आगामी काळात एकादशी, होळी, चंद्रग्रहण आहे. ग्रहांचे गोचर कोणत्या राशींना शुभ ठरू शकेल? आर्थिक आघाडी, करिअर, बिझनेस, नोकरी, कुटुंब या आघाड्यांवर मंगळ आणि शुक्राचा तसेच महालक्ष्मी देवीचा प्रभाव कसा असू शकेल? ५ लकी राशी कोणत्या? जाणून घ्या...
4 / 9
वृषभ: शुक्र मंगळ महालक्ष्मी योग उत्तम लाभदायक ठरू शकेल. सौभाग्याचा काळ, नशिबाची साथ मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नोकरदारांना काळ चांगला जाणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. परदेशात आपले करियर आणि व्यवसाय स्थापित करण्याचा विचार करत आहेत त्यांना यश मिळू शकते. जोडीदार आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
5 / 9
मिथुन: शुक्र मंगळ महालक्ष्मी योग लाभाचा ठरू शकेल. करिअर आणि बिझनेसच्या संदर्भात प्रवास केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी चांगला काळ जाणार आहे. नोकरदारांना पूर्वीच्या मेहनतीचे सुखद परिणाम मिळू शकतात. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. अचानक एखादा प्रिय मित्र भेटू शकतो. जुन्या आठवणी ताज्या होतील.
6 / 9
कन्या: शुक्र मंगळ महालक्ष्मी योग दिलासादायक ठरू शकेल. आयुष्यात काही अडथळे असतील, तर ते दूर होऊ शकतील. कोणताही मोठा निर्णय घेतल्यास कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. खूप दिवसांपासून आपले काम सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
7 / 9
तूळ: शुक्र मंगळ महालक्ष्मी योग शुभ ठरू शकेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी चांगला काळ राहील. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. नोकरदारांना आगामी काळ शुभ ठरू शकेल. मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.
8 / 9
मकर: शुक्र मंगळ महालक्ष्मी योग अनुकूल ठरू शकेल. फायदे आणि तोटे याबद्दल थोडी चर्चा करा. नोकरदारांना खूप काम असेल. काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होतील. अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. अपेक्षित लाभ मिळतील.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य