shukraditya yoga in simha rashi 2024 these 7 zodiac signs get best success and positive effect
१२ महिन्यांनी सूर्य राशीत शुक्रादित्य राजयोग: ७ राशींना लाभच लाभ, अपार यश; पद-पैसा वृद्धी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 2:15 PM1 / 10ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत विविध शुभ, लाभदायक योग जुळून येणार आहेत. ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत विराजमान झाला आहे. या राशीत बुध विराजमान आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांचा लक्ष्मी नारायण नामक शुभ योग जुळून आला आहे. याशिवाय चंद्र ग्रह सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुळून येणार आहे.2 / 10नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास आहे. त्यामुळे सिंहाचा स्वराशीत होत असलेला प्रवेश अतिशय महत्त्वाचा तसेच विशेष मानला गेला आहे. सूर्याचे सिंह राशीतील संक्रमण सिंह संक्रांत म्हणून ओळखले जाईल.3 / 10सूर्याचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर शुक्र आणि सूर्याचा शुक्रादित्य योग जुळून येणार आहे. हा योग राजयोगाप्रमाणे फले देतो, अशी मान्यता आहे. सात राशींवर याचा सकारात्मक अनुकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे.4 / 10वृषभ: शुभ फलदायी सिद्ध होऊ शकेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल आणि यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन यश मिळवाल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. रिअल इस्टेट, जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.5 / 10मिथुन: नशिबाची अन् भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. जेवढे अधिक प्रयत्न कराल, तेवढे उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नतीसह नवीन संधी मिळतील. व्यापाऱ्यांना मागील गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. कुटुंबात सुसंवाद राहील.6 / 10कर्क: शुक्रादित्य योग फायदेशीर ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत कराल. अपेक्षित यश मिळेल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ यशाचा आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल.7 / 10सिंह: विविध फायदे होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. आत्मविश्वास वाढू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळू शकेल. पैशाची कमतरता दूर होण्याची शक्यता आहे.8 / 10कन्या: हा काळ लाभदायक ठरू शकेल. नोकरी आणि करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठू शकाल. नोकरीच्या ठिकाणी बॉस कौतुक करेल. अपेक्षा पूर्ण होतील. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रगतीमुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहू शकेल.9 / 10तूळ: फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. पैशाची आवक वाढू शकेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वृद्धी पाहायला मिळू शकते. नोकरदार लोकांना पदोन्नती, चांगले अप्रायझल मिळू शकते. व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल.10 / 10धनु: शुक्रादित्य राजयोग शुभ ठरू शकतो. नशिबाची उत्तम साथ लाभेल. नेतृत्वगुण वाढतली. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहू शकतील. देश-विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जी कामे आतापर्यंत अवघड वाटत होती ती आता सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications