शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Eclipse 2022 Astrology: १५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:51 AM

1 / 9
हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या जसे ग्रहणाला महत्त्व असते, तसेच ते ज्योतिषीयदृष्ट्याही असते. ग्रहणाचे सर्व राशींवर होणारे परिणाम सांगितले जातात. (Eclipse in 2022)
2 / 9
सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावास्येला म्हणजेच ३० एप्रिल रोजी आहे. तर लगेच १५ दिवसाच्या अंतराने म्हणजे वैशाख पौर्णिमेला यंदाचे पहिले चंद्रग्रहण आहे. या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे असणार आहे, तर चंद्रग्रहण खग्रास स्वरुपाचे असेल. (Solar Eclipse 2022 and Lunar Eclipse 2022)
3 / 9
ग्रहणाचा राशींवर नकारात्मक प्रभाव पडण्याची मान्यता असली, तरी काही राशीच्या व्यक्तींना या ग्रहणाचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. आर्थिक स्थिती, करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. (Surya Grahan 2022 and Chandra Grahan 2022)
4 / 9
सर्व राशींपैकी ५ राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि चंद्र ग्रहण लाभदायक ठरू शकते. सूर्यग्रहणावेळी चंद्र मेष राशीत विराजमान असेल, तर चंद्रग्रहणावेळी चंद्र तूळ राशीत असेल. कोणत्या राशींना दोन्ही ग्रहणे चांगली, सकारात्मक ठरू शकतील, ते जाणून घेऊया... (Eclipse 2022 Astrology)
5 / 9
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण मेष राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये चांगले फल देणारे हे ग्रहण ठरू शकेल. या कालावधीत शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्र, कार्यालयातील सहकाही चांगले सहकार्य करू शकतील. यश, प्रगतीचे मार्ग साध्य करू शकता.
6 / 9
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. नोकरीत प्रमोशन, वेतनवृद्धी होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कार्यालयातील कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतील. एखादा निर्णय घेताना विवेकाने विचार करूनच पुढे जावे, असा सल्ला दिला जात आहे.
7 / 9
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण तूळ राशीच्या व्यक्तींना अनेकविध संधी प्राप्त करून देणारे ठरू शकेल. दोन्ही ग्रहणांचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. अनेक दिवसांपासून शोधत असलेली संधी मिळू शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. व्यापारी वर्गाला विशेष फायदा मिळू शकेल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील.
8 / 9
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. करिअरमध्ये मोहाच्या संधी येऊ शकतील. मात्र, विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे म्हटले जात आहे.
9 / 9
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण मकर राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ मानले जात आहे. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. हाती घेतलेले नवीन काम यशकारक ठरू शकेल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे सांगून येऊ शकतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यsolar eclipseसूर्यग्रहणLunar Eclipseचंद्रग्रहण