शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solar and Lunar Eclipse 2022: १५ दिवसांत दोन ग्रहणे: सूर्य-चंद्र ग्रहणाचा ‘या’ ५ राशींना फायदा; करिअरमध्ये यश, धनलाभाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 2:23 PM

1 / 9
सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अवघ्या १५ दिवसांच्या अंतराने लागणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाला जितके महत्त्व आहे, तितकेच ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही ग्रहणाला वेगळे महत्त्व आहे. ग्रहणाचा प्रभाव राशींसह देश-जगतावर होत असल्याचे सांगितले जाते. (Solar Eclipse 2022 and Lunar Eclipse 2022)
2 / 9
यंदाचे पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावास्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी आहे. तर चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमेला म्हणजेच १६ मे रोजी आहे. सूर्यग्रहण खंडग्रास, तर चंद्रग्रहण खग्रास स्वरुपातील असणार आहे. विशेष म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी बुद्धपौर्णिमा आहे. ही दोन्ही ग्रहणे १५ दिवसांच्या अंतराने होत असल्यामुळे याला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. (Surya Grahan 2022 and Chandra Grahan 2022)
3 / 9
या दोन्ही ग्रहणाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि संमिश्र असा प्रभाव दिसून येऊ शकतो. ग्रहणात दानाचे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. १५ दिवसाच्या अंतराने होणारी दोन्ही ग्रहणे कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ-लाभदायक ठरू शकतील. करिअर, कार्यक्षेत्र, नोकरीत लाभ मिळू शकेल का, ते जाणून घेऊया...
4 / 9
सूर्य आणि चंद्रग्रहण मेष राशीच्या व्यक्तींना शुभ मानले जात आहे. मेष ही सूर्याची उच्च रास मानली जाते. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकेल. करिअरच्या बाबतीत मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. फायदा होऊ शकेल. या कालावधीत शुभवार्ता मिळू शकतील. नोकरदारवर्गाला चांगला लाभ प्राप्त होऊ शकेल. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील.
5 / 9
सूर्य आणि चंद्रग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. याचे उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. नोकरदारवर्गाला प्रमोशन, वेतनवृद्धीच्या शुभवार्ता मिळू शकतील. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येऊ शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. व्यापार, व्यवसाय, उद्योग करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामासाठी प्रवास करावे लागू शकतात.
6 / 9
सूर्य आणि चंद्रग्रहण तूळ राशीच्या व्यक्तींना चांगले ठरू शकेल. एका चांगल्या संधीच्या शोधात असलेल्यांना ती सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकेल. नशीब आणि भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. त्याचा चांगला लाभ मिळेल. व्यापारी वर्गाला हा कालावधी फायदेशीर ठरू शकेल. जुनी येणी वसूल होऊ शकतील. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. करारातून लाभ मिळू शकतील.
7 / 9
सूर्य आणि चंद्रग्रहण धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. करिअरमध्ये चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. ग्रहणाचा शुभ प्रभाव पाहायला मिळू शकेल. मात्र, विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
8 / 9
सूर्य आणि चंद्रग्रहण मकर राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. ग्रहणाचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. या कालावधीत आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल. नशिबाची उत्तम साथ आणि भाग्याचे पाठबळ मिळू शकेल. हाती घेतलेल्या नवीन कामात यश, प्रगती मिळू शकेल. विवाहेच्छूक मंडळींना चांगली स्थळे येऊ शकतील.
9 / 9
सदर माहिती मान्यता आणि ज्योतिषीय गृहीतकांवर आधारित असून, ग्रहणाचा नेमका प्रभाव जाणून घेण्यासाठी तुमची जन्मकुंडली तज्ज्ञ मंडळींना दाखवणे उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यsolar eclipseसूर्यग्रहणLunar Eclipseचंद्रग्रहण