some pics of attractive flower decoration in babulnath temple on the occasion of mahashivaratri 2021
Mahashivratri 2021: महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; पाहा, झलक By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 3:50 PM1 / 15मराठी वर्षात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सण-उत्सवांपैकी महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. 2 / 15तसे पाहायला गेल्यास प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. 3 / 15सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. शिवभक्त मोठ्या श्रद्धेने हा सण साजरा करीत असतात.4 / 15यंदा मात्र महाशिवरात्रीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. 5 / 15तरीही घरच्या घरी किंवा सर्व नियम पाळून शिवभक्त महाशिवरात्रीचा सण साजरा करतील, असे सांगितले जात आहे. 6 / 15मुंबईतील प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 7 / 15मुंबईतील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. 8 / 15राजा भीमदेवद्वारे साधारण १२ व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. 9 / 15काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळापासूनचे शिल्प आजच्या घडीलाही या मंदिरात आहेत. पूर्वी हे मंदिर पारशी लोकांच्या अखत्यारीत होते. 10 / 15साधारण नव्वदीच्या दशकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती. येथील मंदिर पुजारी असलेल्या व्यक्तींनाही खूपच मान देण्यात येतो. 11 / 15चर्नी रोड वा ग्रँट रोड स्टेशनवरून बस वा टॅक्सी करून बाबुलनाथ मंदिरात जाता येते. 12 / 15महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने शिवपूजन केले जाते. 13 / 15शिवपूजनात रुद्राभिषेकाला मोठे महत्त्व आहे. शिवपूजनासह महादेव शिवशंकरांचे नामस्मरण, आराधना, उपसना केली जाते. 14 / 15शंकराला आपण भोळा सांब असे म्हणतो. शिवाय त्याचे एक नाव आशुतोष असेही आहे. आशुतोष म्हणजे पटकन संतुष्ट होणारा देव. 15 / 15अनेकांना १६ सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications