शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Mantra: कमी वयात मोठे यश संपादन करायचे असेल तर 'या' सात सवयी आजपासून लावून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 4:46 PM

1 / 8
कमी वयात भरपूर यश संपादन केलेल्या अनेक लोकांची चरित्र आपल्या समोर आहेत. तरी ताजे उदाहरण घ्यायचे तर ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचे घेता येईल. आज संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. कारण महासत्ता असणाऱ्या ब्रिटनचा सर्वोच्च नागरी पदाचा पदभार त्यांनी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी स्वीकारला आहे. अर्थात हे एका रात्रीत मिळालेले यश नसून अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. आपणही अशा यशासाठी कटिबद्ध होऊया!
2 / 8
भूतकाळाचा विचार करून वर्तमान बिघडवू नका. 'आज' वर लक्ष केंद्रित करा, आजवर झालेल्या घटनांवर नाही! ज्यांचा त्रास होतो अशा लोकांना माफ करायला शिका. त्यामुळे त्यांचा नाही पण तुमचा त्रास निश्चितच कमी होईल.
3 / 8
जगाचा नियम आहे, तुम्ही चांगलं वागलात तरी लोक नावं ठेवणार आणि वाईट वागलात तरी नावं ठेवणार. अशा वेळी लोकांआधी आपल्या मनाला पटेल, रुचेल त्याचा विचार करा, ते योग्य असेल तर उद्या नावं ठेवणारेच तुम्हाला आदर्श मानतील.
4 / 8
'कालाय तस्मै नमः' असे आपण म्हणतो. काळ हे सर्व गोष्टींवरचे औषध आहे. एखादी गोष्ट प्रयत्न करूनही मनासारखी होत नसेल तर मागे लागू नका, सोडून द्या. विश्वास ठेवा, काही काळाने त्या गोष्टीशी संबंधित घटना आपोआप घडू लागतील.
5 / 8
स्पर्धा दुसऱ्यांशी कराल तर कायम दुःखी राहाल, स्वतःला कालपेक्षा आज कसे चांगले बनवता येईल याचा विचार आणि त्यादृष्टीने प्रयत्न करत राहा. अशी तुलना केलीत तर कायम यशस्वी व्हाल.
6 / 8
सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते. जर आपल्या मनाप्रमाणे परिस्थिती नसेल तर परिस्थितीशी मन जुळवून घ्यायला शिका आणि शांत राहा, जे होईल ते चांगल्यासाठीच!
7 / 8
सद्गुरू वामनराव पै नेहमी म्हणायचे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! हे माहीत असूनही आपण आपले सुख इतरांवर विसंबून ठेवतो. त्यामुळे आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्यांच्या हाती जाऊन आपण परावलंबी होतो. त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हाती घ्या आणि सारासार विचार करून घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून आपले ध्येय गाठा!
8 / 8
आयुष्य छोटंस आहे. ते रागात, मनःस्तापात, दुसऱ्यांचे उणेदुणे काढण्यात ते वाया घालवू नका. परिस्थिती चांगली असो नाहीतर वाईट, ती सतत बदलत राहणार आहे हे लक्षात ठेवा. चेहऱ्यावरचे स्मित ढळू देऊ नका. आशावादी आणि प्रयत्नवादी व्हा, भाग्य देखील हसत हसत तुमच्या वाट्याला येईल!
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी