शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वात शुभ मानली जाते हातावरील अशी रेषा; बनतात परदेशवारीचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 5:23 PM

1 / 6
हस्तरेषा शास्त्रात रेषा या महत्त्वाच्या मानल्या जातात. रेषेचा उगम आणि तिची प्रगती यावर भविष्याचं आकलनं केलं जाते. रेषा कोठून उगम पावते आणि ती कोणत्या मार्गाने जात आहे, यामुळे शुभ अशुभ रेषेच्या स्थिती निर्माण होते.
2 / 6
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील रेषा मणिबंधापासून सुरू होऊन मंगळ पर्वताच्या दिशेने जात असेल, तर ते रेषा समुद्री प्रवासाचे संकेत देते. पहिल्या मणिबंधापासून चंद्राच्या पर्वतापर्यंत जाणाऱ्या रेषा सर्वात शुभ मानल्या जातात. हातातील अशी रेषा यशस्वी प्रवास आणि शुभ परिणामाचे संकेत देते.
3 / 6
हस्तरेषा शास्त्रानुसार, चंद्र पर्वतातून बाहेर पडणारी एखादी रेषा भाग्यरेषेला छेदणाऱ्या जीवनरेषेला मिळत असेल, तर अशी व्यक्तीचा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास होऊ शकतो.
4 / 6
जर जीवनरेषा वळून चंद्र पर्वतावर पोहोचत असेल तर ती व्यक्ती दूरच्या देशांमध्ये प्रवास करते. याशिवाय अशा व्यक्तीचा जन्मस्थानापासून दूर परदेशात मृत्यू होतो.
5 / 6
उजव्या हातात परदेश प्रवासाची रेषा असेल, पण डाव्या हातावर या रेषांचा अभाव असेल किंवा रेषेच्या सुरुवातीला क्रॉस किंवा बेटाचं चिन्ह असेल तर अशा व्यक्तीला परदेश प्रवासात अडथळा येतो. अनेक अडथळ्यांमुळे अशा व्यक्तीला आपला परदेश प्रवास रद्द करावा लागू शकतो.
6 / 6
हातावर तुटलेल्या किंवा अस्पष्ट रेषा असल्यास केवळ प्रवासाचा कार्यक्रम ठरतो, परंतु प्रवास होत नाही. चंद्र पर्वतावरून उगवलेल्या आडव्या रेषा चंद्र पर्वतालाच ओलांडणाऱ्या भाग्यरेषेला मिळाल्या तर दूरच्या देशांत फलदायी प्रवास घडतात. प्रवास रेषेवर क्रॉस असेल तर प्रवासादरम्यान अपघात किंवा इतर कोणतीही दु:खद घटना घडण्याची शक्यता असते.