शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षांनी राजलक्षण राजयोग: ५ राशींवर गुरुकृपा, कमाईत भरघोस वाढ; लाभच लाभ, सूर्य शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 1:34 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी, नक्षत्र गोचराचा प्रभाव देश-दुनियेसह सर्व राशींवर पडत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा अन्य ग्रहांची युती, संयोग होऊन काही शुभ योग, राजयोग तयार होत असतात. या शुभ योगांचा तसेच राजयोगांचा अतिशय सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळत असतो.
2 / 9
तब्बल १२ वर्षांनंतर असाच एक राजयोग जुळून येत आहे. १६ डिसेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याचे धनु राशीतील संक्रमण धनु संक्रांत म्हणून ओखळले जाते. याला खरमास असेही म्हणतात. या काळात काही कार्ये निषिद्ध मानली गेली आहेत. सूर्याने धनु राशीत प्रवेश करताच, मेष राशीत विराजमान असलेल्या गुरु ग्रहाशी विशेष योग जुळून येत आहे.
3 / 9
सूर्य ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर मेष राशीतील गुरुशी नवम पंचम योग जुळून येणार आहे. सूर्य आणि गुरुच्या योगामुळे राजलक्षण नामक राजयोग जुळून येत आहे. या राजलक्षण राजयोगामुळे राजाप्रमाणे लाभ, प्रगती आणि सन्मान मिळतो. राजलक्षण राजयोगामुळे सोन्याचे भाव काहीसे घसरतील, बाजारात स्थिरता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
4 / 9
सूर्य आणि गुरुच्या राजलक्षण राजयोगाचा ५ राशींवर अतिशय सकारात्मक आणि शुभलाभदायी प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. नवेवर्ष २०२४ मध्येही या राजयोगाचा लाभ या राशींना मिळत राहील. या राशींना आर्थिक आघाडी, करिअर, नोकरी, बिझनेस यासह जीवनातील अन्य क्षेत्रांवर यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना राजलक्ष्णा राजयोगामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकेल. बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर उत्तम संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याच्या प्रयत्नात प्रगती होईल. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकाल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसून येतील.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना राजलक्षण राजयोगाच्या प्रभावामुळे उत्तम फळ मिळू शकेल. कमाई जास्त असेल. त्यानुसार खर्चही वाढू शकेल. खर्च नियंत्रित करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. कुटुंबासोबत छान प्रवासाची योजना आखू शकता.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना जबरदस्त लाभ होऊ शकेल. व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. या योगाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. पैसे मिळवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरी मिळवण्यात यश मिळू शकते.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना नवे वर्ष नवीन अपेक्षांनी भरलेले मानले जाते.योजना यशस्वी होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. स्वतःचे घर किंवा कार खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सुखसोयी वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल. ऑफिसमध्ये कामावर लोक खूप खूश होतील. बॉस प्रमोशनसाठी शिफारस करू शकतो.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना राजलक्षण राजयोग फायदेशीर मानला जातो. नवीन वर्षासाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या पूर्ण होतील. जे विद्यार्थी अभ्यासाच्या शेवटच्या वर्षात आहेत त्यांना नोकरी मिळवण्यात यश मिळू शकते. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. समाजात दर्जा वाढेल. तुमचे बोलणे सर्वांना आवडेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य