शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१६ जुलैपासून ‘या’ ५ राशींना अच्छे दिन! करिअर, आर्थिक दृष्टिने मोठा लाभ; उत्तम संधींचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:39 AM

1 / 9
जुलै महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाला कर्क संक्रांती असे म्हटले जाते. १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार असून, आगामी महिनाभर याच राशीत विराजमान असेल.
2 / 9
कर्क राशीत सूर्याच्या आगमनाचा जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर होणारा परिणाम होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. यासोबतच सूर्य कर्क राशीत आल्याने त्याचा प्रभाव राशींवरही दिसून येईल.
3 / 9
सूर्याचे हे संक्रमण अनेक राशींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल. त्याचा प्रभाव पुढील १ महिन्यापर्यंत दिसून येईल. सूर्याला करिअर, नेतृत्वाचा कारक मानले गेले आहे.
4 / 9
कर्क संक्रांतीला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. या संक्रांतीला सूर्याचा शुभ प्रभाव अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात दिसून येईल. आताच्या घडीला आषाढी एकादशीनंतर चातुर्मासास सुरुवात झाली आहे.
5 / 9
सूर्याचे गोचर वृषभ राशीचे व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. या काळात स्वत:ला उर्जेत परिपूर्णता जाणवेल. व्यावसायिकांना मोठा नफा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी बदली मिळू शकते आणि काही लोकांना बढतीही मिळू शकते. तथापि, लहान भावंडांसोबत संभाषण करताना तुम्हाला शब्द विवेकीपणे वापरावे लागतील.
6 / 9
सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश याच राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. या कालावधीत सकारात्मकता वाढू शकेल. आपण सामाजिक स्तरावर खूप सक्रिय होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेगही वाढेल आणि यामुळे तुम्हाला फायदाही होऊ शकतो. या काळात नशीबही साथ देईल. आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे.
7 / 9
सूर्याचे राशीसंक्रमण कन्या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. या काळात अनेक स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. केवळ आर्थिक लाभच मिळणार नाहीत, तर या पैशाची योग्य गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात नफाही मिळवू शकता. नोकरीच्या शोधात चांगली नोकरी मिळू शकते. सूर्यदेवाच्या कृपेने या काळात तुमच्या मान-सन्मानातही वाढ होऊ शकते.
8 / 9
तूळ राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित कराल आणि सतत पुढे जाल. रखडलेले काम ज्येष्ठांच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. तुमची विवेकशक्ती विकसित होईल. उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना काही यश मिळू शकते.
9 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्ती सूर्य संक्रमणाच्या काळात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घेऊ शकतात. ज्ञानप्राप्तीसाठी योग विषयांचा अभ्यास करू शकतात. तुमच्या मार्गदर्शनाने घरातील तरुण सदस्यांच्या आयुष्यात काही चांगले बदल घडू शकतात. उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शैक्षणिक जीवनातही चांगले बदल दिसून येतील. सामाजिक स्तरावरही तुमचा सन्मान वाढू शकतो.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य