शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makar Sankranti 2023 Trigrahi Yoga: मकर संक्रांतीला त्रिग्रही योग: ‘या’ ९ राशींना वरदान; सर्वोत्तम काळ, २ शत्रू ग्रह शुभच करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 7:18 AM

1 / 15
नवीन वर्षाचा पहिला मोठा सण असलेल्या मकर संक्रांतीला अनेकविध विशेष योग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रातीचा काळ हा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या दिवशी २ शत्रू ग्रह एकाच राशीत असणार आहेत. तसेच मकर राशीतील तीन ग्रहांच्या युतीमुळे अद्भूत असा त्रिग्रही योग जुळून येत आहे. (sun saturn venus trigrahi yoga on makar sankranti 2023)
2 / 15
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ जानेवारी रोजी नवग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत आधीच नवग्रहांचा न्यायाधीश शनी विराजमान आहे. तसेच शुक्रही याच राशीत आहे. त्यामुळे सूर्य, शनी आणि शुक्राचा त्रिग्रही योग मकर राशीत जुळून येत आहे. (surya shani and shukra trigrahi yog on makar sankranti 2023)
3 / 15
शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र असले तरी शत्रू ग्रह मानले गेले आहेत. २ शत्रू ग्रह एकाच राशीत असल्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल, असे सांगितले जात आहे. या दोन ग्रहांसोबत शुक्रही याच राशीत असल्यामुळे काही राशींना हा अद्भूत त्रिग्रही शुभ-लाभदायक ठरू शकेल. तर काही राशींना हा काळ संमिश्र जाईल. तसेच काही उपायही सांगितले गेले आहेत. जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या त्रिग्रही योगाचा उत्तम लाभ होऊ शकेल. कार्यक्षेत्रात खूप सक्रिय व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. राजकारण आणि वैद्यक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला असेल. कौटुंबिक संबंधांमध्ये थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. समजूतदारपणे काम केल्याने फायदा होईल. सूर्य मंत्रांचा जप करावा, याचा लाभ होऊ शकेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. ज्या क्षेत्रात तुम्हाला स्वारस्य नाही त्या क्षेत्रांमध्ये रस वाढेल. चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता. १५ जानेवारीनंतर काळ थोडा कठीण जाईल. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित लोकांसाठी वेळ खूप चांगला असू शकतो. करिअर करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. करिअर निवडताना थोडी काळजी घेतल्यास फायदा होईल. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग यशकारक ठरू शकेल. या काळात अशा काही गोष्टी घडू शकतात, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक संबंध वाढू शकतील. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळेल. नियमितपणे श्रीगणेशाचे पूजन, नामस्मरण करावे.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. भागीदारीतील कामात फायदा होऊ शकेल. तुमच्या अहंकारामुळे नात्यात काही तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. कौटुंबिक जीवन सामान्य असेल. राधाकृष्णाची पूजा करावी.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. शत्रूंवर विजय मिळवता येऊ शकेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. या काळात तुमची कारकीर्द खूप चांगली होणार आहे. गायत्री मंत्राचा जप करणे चांगले राहील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग चांगला ठरू शकणार आहे. तुमच्या मुलांसाठी खूप चांगला काळ असेल. उच्च शिक्षणाची तयारी करत असलेल्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतील. तुम्हाला तुमच्या करिअरकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. देवी सरस्वतीची पूजा करावी. लाभ मिळेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग सकारात्मक ठरू शकेल. तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत आनंद मिळेल. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता ठेवा. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गरजूंना दान केल्यास फायदा होईल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही आधीच विचार केलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला त्यात चांगले परिणाम मिळतील. भागीदारीत काम केल्याने तुम्हाला मोठा फायदा होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. शनिवारी आणि मंगळवारी हनुमंतांचे पूजन, नामस्मरण करावे. तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग प्रगतीकारक ठरू शकेल. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यापारी वर्गाला थोडे स्थैर्य मिळेल. आर्थिक आघाडीवर चांगला काळ आहे. प्रवास बऱ्यापैकी लाभ देतील. करिअरमध्ये यश मिळेल. सकाळी लवकर उठून नारायण कवच पठण करा.
13 / 15
मकर राशीत सूर्य, शनी आणि शुक्राचा अद्भूत मानला गेलेला त्रिग्रही योग जुळून येत आहे. याचा त्रिग्रही योगाचा या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक लाभ मिळू शकेल. मनोबल चांगले राहील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्या महिला व्यवसाय सुरू करू शकतात. करिअरच्या बाबतीत तुम्ही उंची गाठाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल. गरजूंना शनी संबंधित वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरू शकेल. लाभ होईल. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामात काही अडथळेही येऊ शकतात. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त भावनिक होणे टाळावे. कोणावरही अवलंबून राहू नका. मात्र, व्यवसायात प्रगती होईल. चांगला नफाही मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. नव्याने करिअरची सुरुवात करणाऱ्यांनी विचापूर्वक निर्णय घ्यावेत. तुम्हाला फायदा होऊ शकेल. गायत्री मंत्राचा जप करावा.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना मकर संक्रांतीचा त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल. तुम्हाला फायदा होईल. पैशाची आवक होऊ शकते. मात्र, खर्चही वाढू शकेल. विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला काळ आहे. आत्मविश्वास, मनोबल खूप वाढेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या बाबतीत यश मिळेल. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. सूर्य मंत्रांचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य