sun transit in cancer 2021 know about these 5 zodiac sign get benefit of surya in kark rashi
Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:48 PM1 / 10नवग्रहातील प्रत्येक ग्रह एक ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी किंवा वक्री चलनाने प्रवेश करत असतो. सूर्याला नवग्रहांचा राजा मानले गेले आहे. (sun transit in cancer 2021)2 / 10सूर्य साधारण ३० दिवसांनी एक रास बदलतो. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. सूर्य केवळ मार्गी चलनाने राशी प्रवेश करतो. १६ जुलै २०२१ रोजी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (Kark Sankranti 2021)3 / 10सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाला कर्क संक्रांत म्हटले जाते. कर्कचा राशी स्वामी चंद्र आहे. १६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजून ४१ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल आणि १७ ऑगस्ट २०२१ रोजी रात्रौ ०१ वाजून ०५ मिनिटांपर्यंत याच राशीत असेल. (surya in kark rashi 2021)4 / 10सूर्य गुरु, शुक्र आणि चंद्र या ग्रहांशी युती झाल्यावर शुभफल देतो, असे म्हटले जाते. सूर्य करिअर, नोकरी, मान-सन्मान, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. जन्मकुंडलीत सूर्य कमकुवत असेल, तर सूर्योपासना करणे शुभलाभदायक मानले जाते. 5 / 10सूर्य नमस्कार, आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य मंत्र आणि स्तोत्र यांच्या माध्यमातून कुंडलीतील सूर्य मजबूत होऊ शकतो, अशी मान्यता आहे. सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश म्हणजेच कर्क संक्रांतीचा काळ नेमक्या कोणत्या राशीसाठी फलदायी ठरू शकतो? जाणून घेऊया...6 / 10सूर्याचा कर्क राशीत होणारा प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकेल. हाती घेतलेली कामांत यश मिळू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले ट्युनिंग जमू शकेल. कार्यक्षत्रात प्रगती साध्य करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी कर्क संक्रांतीचा काळ उत्तम राहील, असे सांगितले जात आहे. 7 / 10सूर्याचा कर्क राशीत होत असलेला प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम फलदायी ठरू शकेल. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल. मात्र, काही घटनांमुळे निराशा पदरी पडू शकेल. मात्र, कोणत्याही वाद-विवादात पडू नका. याचा लाभ मिळू शकेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शक्य असल्यास नियमितपणे सूर्याला अर्घ्य द्यावे, असे सांगितले जात आहे. 8 / 10सूर्याचा कर्क राशीत होत असलेला प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायक ठरू शकेल. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी अधिक पैसे खर्च होऊ शकतील. वरिष्ठ अधिकारी कामाचे कौतुक करू शकतील. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकते, असे सांगितले जात आहे. 9 / 10सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश तुळ राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. करिअर आणि प्रतिष्ठाकारक आगामी काळ जाऊ शकेल. भविष्यातील योजना यशकारक ठरू शकतील. तसेच कौटुंबिक आनंद द्विगुणित होऊ शकेल. कार्यक्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची संधी मिळू शकेल. नोकरदारवर्गाला प्रमोशनची आनंदवार्ता मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 10 / 10सूर्याचा कर्क राशीत होत असलेला प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना शुभ प्रभावकारक आणि अनुकूल ठरू शकेल. तसेच आगामी कालावधीत परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम ठरू शकेल. जोडीदाराशी वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. आर्थिक आघाडीवर चिंता वाढू शकते. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करावेत, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications