शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिथुन संक्रांत: सूर्य संक्रमणाचा ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; नेमकी काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 8:08 AM

1 / 9
जून महिन्यातील नवग्रहांच्या ५ ग्रहांच्या गोचरापैकी महत्त्वाचा बदल म्हणजे सूर्याचे राशीसंक्रमण. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्या शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (sun transit gemini 2022)
2 / 9
सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे १५ जून २०२२ रोजी सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला की, पुढील महिनाभर हा कालावधी मिथुन संक्रांत म्हणून ओळखला जाईल. सूर्याला नेतृत्व, तेजकारक मानले जाते. सूर्याचे कुंडलीतील स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. (surya gochar mithun rashi 2022)
3 / 9
सूर्य शुभ किंवा लाभदायक स्थानी असेल, तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. सूर्य प्रतिकूल भावात असेल, तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेकविध उपायही सांगितले जातात. ते केल्याने सूर्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो, अशी मान्यता आहे. (mithun sankranti 2022)
4 / 9
सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाचा सर्व बाराही राशीच्या व्यक्तींवर प्रभाव पडेल. मात्र, ५ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे मिथुन राशीतील संक्रमण काहीसे संमिश्र ठरू शकेल. मिथुन संक्रांतीचा काळ कोणत्या राशींना आव्हानात्मक ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
5 / 9
मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना मिथुन संक्रांतीचा कालावधी काहीसा संमिश्र ठरू शकेल. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल, तर अनुभवी लोकांचा, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. भावंडांशी वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. या कालावधीत पैसे उधार देऊ नका अन्यथा तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर होऊ शकेल.
6 / 9
मिथुन राशीत होणारे सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. मुलांची चिंता सतावू शकेल. जोडीदाराशी वाद संभवतो. मेहनत करूनही फळ मिळेलच असे नाही. घरगुती गरजांवर जास्त पैसे खर्च होतील, त्यामुळे धनहानी होईल. जिथे गरज आहे तिथे पैसे खर्च करा, नाहीतर तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.
7 / 9
सूर्याच्या मिथुन प्रवेशाचा कर्क राशीच्या व्यक्तींना तणावाचा ठरू शकतो. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि चिंतित होऊ शकता. या कालावधीत कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा पैसे परत मिळणे कठीण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी खूप मेहनत करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनातही चढ-उतार येतील, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
8 / 9
मिथुन संक्रांतीचा काळ तूळ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकेल. मुलांची चिंता सतावेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा अन्यथा धनहानी होऊ शकते. योगसाधना, ध्यानधारणा केली तर मन शांत राहू शकेल. व्यवसायात बदल करू नका, नाहीतर नुकसान होऊ शकेल.
9 / 9
मिथुन संक्रांतीचा काळ तूळ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकेल. मुलांची चिंता सतावेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा अन्यथा धनहानी होऊ शकते. योगसाधना, ध्यानधारणा केली तर मन शांत राहू शकेल. व्यवसायात बदल करू नका, नाहीतर नुकसान होऊ शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य