शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्क संक्रांती: ‘या’ ५ राशींवर महादेवांची कृपा; सूर्याच्या तेजाने चमकेल नशीब, यश, प्रगतीचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:25 AM

1 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. जुलै महिन्यातही सूर्य गोचर होणार आहे. आताच्या घडीला सूर्य मिथुन राशीत विराजमान आहे. सूर्याला करिअर, नेतृत्वाचा कारक मानले गेले आहे. (sun transit in cancer 2022)
2 / 9
मिथुन राशीत असलेला सूर्य १६ जुलै रोजी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी संक्रमणाला कर्क संक्रांत असे म्हटले जाते. पुढील साधारण महिनाभर सूर्य याच राशीत विराजमान असेल. (surya in karka rashi 2022)
3 / 9
कर्क संक्रांतीला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. या संक्रांतीला सूर्याचा शुभ प्रभाव अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात दिसून येईल. आताच्या घडीला आषाढी एकादशीनंतर चातुर्मासास सुरुवात झाली आहे. (karka sankranti 2022)
4 / 9
या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. या काळात जगाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यामुळे आगामी कालावधीत महादेवांची कृपा राहू शकेल. सूर्याच्या कर्क संक्रांतीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे हे संक्रमण खूप अनुकूल ठरू शकेल. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनाही यश मिळण्याची अपेक्षा आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण ठेवावे. शक्य असल्यास रोज १०८ वेळा गायत्री मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरू शकेल.
6 / 9
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. या कालावधीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरदार वर्गाला पगार आणि पदोन्नतीमध्ये वाढ अपेक्षित आहे. मित्रांची उत्तम मदत लाभेल. तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या आयुष्यात उर्जेची कमतरता जाणवेल. तुमच्या कुटुंबात भांडण आणि वादाचे प्रसंगही येऊ शकतात.
7 / 9
सिंह राशीच्या लोकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना यश, प्रगतीचे कवाडे खुली होऊ शकतात. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांचा व्यवसायही खूप लाभदायक ठरू शकतो. आपण फसव्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. तुमचे प्रतिस्पर्धी तुमची बदनामी करून तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करू शकता. शक्य असेल तर, दररोज सूर्याला अर्घ्य देणे उपयुक्त ठरू शकेल.
8 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचे संक्रमण खूप चांगले असू शकते. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळण्याची आशा आहे. कोणत्याही कामात जास्त पैसे गुंतवण्यापासून स्वतःला थांबवा. तुम्ही रणनीती बदलून काम केले तर तुम्हाला नफा मिळणे अपेक्षित आहे. या काळात अनेक नवीन मित्र बनू शकतात. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर दर मंगळवारी रामचरितमानसाचे पठण करावे.
9 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे संक्रमण खूप लाभदायक ठरू शकेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि पगार वाढीचा योग जुळून येऊ शकतो. मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांना काही नवीन रणनीतींचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आर्थिक मदतही मिळू शकते. शक्य असेल तर मंदिरात गूळ आणि पीठ दान करणे उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य