शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ शत्रू ग्रहांचा षडाष्टक योग: ५ राशींना खडतर, करिअमध्ये चढ-उतार; राहावे सतर्क, संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 1:51 PM

1 / 9
नवग्रहांचा राजा असलेला सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करत आहे. १७ ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत विराजमान असेल. विशेष म्हणजे याच काळात चातुर्मासातील अधिक मास असणार आहे. यंदा २०२३ रोजी श्रावण मास अधिक आहे.
2 / 9
सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशानंतर आगामी महिनाभराचा काळ कर्क संक्रांती म्हणून ओखळला जाईल. जुलै महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कर्क राशीत विराजमान झाला आहे.
3 / 9
सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. काही राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योगाचा उत्तम लाभ होऊ शकेल तसेच शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. दुसरीकडे, शनी आणि सूर्याचा षडाष्टक योग जुळून येत आहे. या योगाचा काही राशींवर प्रतिकूल प्रभाव दिसून येऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
4 / 9
पुराणांनुसार, शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र मानले गेले असून, ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि सूर्य शत्रू ग्रह मानले गेले आहेत. सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश आणि शनीसोबतचा षडाष्टक योग कोणत्या राशींसाठी संमिश्र काळ ठरू शकेल? जाणून घेऊया...
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे. अनपेक्षितपणे खर्च समोर येऊ शकतात. दुसरीकडे, बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर यावेळी उत्कृष्ट संधी येऊ शकतात. असे असले तरी निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा विचार करावा लागेल. अन्यथा नुकसान होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यातही काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. बोलण्यात कठोरता वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात.
6 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वडिलांसोबतचे नाते बिघडू शकेल. प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने हे संक्रमण खूप अस्थिर असू शकते. नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ नाही. कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकेल. जोडीदाराशी काही जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर आगामी कालावधी संमिश्र ठरू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे धावपळ करावी लागू शकेल. मानहानी होऊ शकते. जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहा. शक्य असेल तर दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे किंवा श्रवण करावे.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांमधील संबंध बिघडू शकतात. नुकसान होऊ शकते. व्यवसायात एका प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकेल. वादविवादापासून दूर राहावे. करिअरच्या दृष्टीने कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळावे. शक्य असल्यास सूर्याला लाल रंगाची फुले अर्पण करावीत.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही कारणास्तव खूप तणाव येऊ शकेल. विरोधक षडयंत्र रचू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तणावाचा सामना करावा लागू शकतो. बॉससोबतचे संबंध प्रभावित होऊ शकतात. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य