शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७७ वर्षांनी मकरसंक्रांतीला शुभ योग: ५ राशींना सर्वोत्तम, परदेशातून लाभ; नोकरीत पदोन्नती योग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 8:48 AM

1 / 9
नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षातील पहिला मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशीतील संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश मकरसंक्राती म्हणून साजरा केला जातो.
2 / 9
१४ जानेवारी २०२४ रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ०७ वाजून १० मिनिटे ते सायंकाळी ०६ वाजून २० मिनिटे आहे. तर १६ जानेवारी रोजी किंक्रांत आहे. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अनेकार्थाने सकारात्मक मानला जातो. ७७ वर्षांनी मकरसंक्रांतीला शुभ योग जुळून येत आहेत.
3 / 9
सूर्याचा मकर राशीतील प्रवेश ५ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. सूर्याचे शनीचे राशी मकर राशीत होणारे संक्रमण अनेक राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. सूर्याचे हे संक्रमण ५ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत खूप सकारात्मक असणार आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ ठरू शकेल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी आणि यश मिळू शकते. एवढेच नाही तर करिअरमध्ये व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांनाही चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून जास्त नफा आणि परतावा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत चांगले आणि प्रामाणिकपणा दाखवण्यात यशस्वी व्हाल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळू शकते.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक चांगल्या संधी मिळतील. करिअरच्या दृष्टीने खूप भाग्यवान ठरणार आहे. परदेशात नोकरी करतात त्यांना उच्च यश मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. संपत्तीच्या दृष्टीने खूप चांगले आणि लाभदायक ठरणार आहे. गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवू शकता. या काळात जोडीदारासोबतचे नाते खूप सकारात्मक असणार आहे. कुटुंबातील परिस्थिती आनंदाने भरलेली असेल.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना चांगले यश आणि मान्यता मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळविण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक भागीदारीत काम करणाऱ्यांना पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च पातळीवरील नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रयत्नातून यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रयत्नातून यश मिळेल. प्रवासाचा लाभ मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. भावंडे पूर्ण सहकार्य करतील. करिअरशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. हिम्मतही वाढेल.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील. पूर्णपणे समाधानी दिसाल. प्रमोशनही मिळेल. अनेक गोष्टींमुळे आश्चर्यचकित होऊ शकाल. आयुष्यात आनंद येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. नात्यात प्रेमाची भावना निर्माण होईल. आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMakar Sankrantiमकर संक्रांती