शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा मिथुन प्रवेश: ६ राशींवर प्रतिकूल प्रभाव, संमिश्र काळ; खर्चात वाढ शक्य, असावे सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 7:07 AM

1 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. सूर्य साधारण एक महिना एका राशीत असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. वृषभ राशीतून मिथुन राशीत होत असलेले सूर्याचे गोचर मिथुन संक्रांती म्हणूनही ओळखला जाईल. यानंतर आता जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल.
2 / 9
आताच्या घडीला सूर्य वृषभ राशीत आहे. सूर्यासोबत नवग्रहांचा राजकुमार बुधही या राशीत आहे. सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी बुध मिथुन राशीत विराजमान होईल. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येईल. सूर्याची मिथुन संक्रांती महत्त्वाची मानली गेली आहे. मिथुन ही बुधाचे स्वामित्व असलेली रास आहे. या राशीत बुध आणि सूर्याची युती विशेष मानली जाते.
3 / 9
मात्र, सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना समस्याकारक, आव्हानात्मक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. सूर्याचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये वाढ करेल, तर काही राशीच्या राशीच्या लोकांना पैसे आणि कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशींना मिथुन संक्रांती संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. समस्या वाढू शकतात. करिअरमध्ये नवीन समस्या उद्भवू शकतात. लोकांशी संबंध प्रभावित होतील. खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारावर खर्च होऊ शकतात. मालमत्ता खरेदी-विक्रीमध्ये नुकसान होऊ शकते.
5 / 9
मिथुन राशीत सूर्याचा प्रवेश होत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. उत्साह आणि आत्मविश्वास वाढू शकेल. मात्र, रागामुळे समस्या येऊ शकतात. महत्त्वाचे काम बिघडू शकते. अचानक आक्रमकता वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. जोडीदारासोबत काही जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. सहकाऱ्यांकडून तेवढे सहकार्य मिळेल असे नाही. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहील. रागावर नियंत्रण ठेवावे. संयमाने काम करावे.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. घरातील समस्या अचानक वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागू शकेल. त्या प्रमाणात यश मिळेलच असे नाही. नोकरदारांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. त्यामुळे समस्या वाढू शकतात. भावंडांसोबतच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतो. कोणत्याही बाबतीत यश मिळविण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागू शकतो.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मिथुन प्रवेश फारसा अनुकूल ठरेल असे नाही. अनेक प्रकारच्या समस्या अचानक वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण वेळ वाया घालवू नका. वाद किंवा मतभेदामुळे तणाव वाढू शकतो. काम करण्यात अडचण येऊ शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक तणाव असू शकतो. जोडीदारासोबत संघर्ष वाढू शकतो. जीवनात समस्या वाढू शकतात. व्यवसायात काही कारणाने नुकसान होऊ शकते. चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येऊ शकता. प्रवास करताना सामानाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मालमत्ता खरेदी-विक्री करताना अडचणी येऊ शकतात. काही प्रलंबित प्रकरण असल्यास ते निकाली काढता येईल. काही त्रास आणि तणाव वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य