शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१७ ऑगस्टला सूर्याचा सिंह प्रवेश: ‘या’ ४ राशींना भाग्योदयाचा शुभ काळ; धनलाभासह नोकरीत प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 8:10 AM

1 / 9
ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास ऑगस्ट महिना अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाचे आपले विद्यमान स्थान सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. यातील एक महत्त्वाचा राशीबदल हा सूर्याचा असणार आहे. सूर्य चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीतून स्वराशीत विराजमान होणार आहे. (sun transit in leo 2022)
2 / 9
१७ ऑगस्ट २०२२ रोजी सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान होणार आहे. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास आहे. सूर्याचे स्वराशीत विराजमान होणे शुभ मानले जात आहे. सूर्याच्या या संक्रमणाला सिंह संक्रांत असेही म्हटले जाते. पुढील साधारण महिनाभर सूर्य सिंह राशीत विराजमान असेल. यानंतर तो बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल. (surya in sinha rashi 2022)
3 / 9
ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नवग्रहांमध्ये सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो. सिंह राशीत प्रवेश केल्याने सूर्य अनेक राशीच्या लोकांना ऊर्जा देईल तसेच शक्ती प्रदान करेल, असे सांगितले जात आहे.
4 / 9
सूर्याचा स्वराशीतील म्हणजेच सिंह राशीतील प्रवेश अनेक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. पैसा आणि करिअरच्या बाबतीत चार राशींसाठी वेळ खूप शुभ राहील. कोणत्या राशींवर सूर्याच्या संक्रमणाचा सकारात्मक प्रभाव पडेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा सिंह प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. या कालावधीत विद्यार्थ्यांना खूप फायदा होऊ शकेल. अभ्यासावर अधिक लक्ष दिल्याने ते चांगली कामगिरी करू शकतील. इतकेच नाही तर तुमचे रोमँटिक आयुष्यही खूप चांगले जाणार आहे. पैशाच्या बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. या काळात तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. सहकारी आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा सिंह प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. संशोधनाशी संबंधित विद्यार्थीही त्यांच्या क्षेत्रात अधिक चांगले काम करताना दिसतील. जे लोक वित्त क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होऊ शकेल.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना राशीस्वामी असलेल्या सूर्याचे आगमन लाभदायक ठरू शकेल. या राशीच्या लोकांची उर्जा वाढेल. यासोबतच तुमचा आत्मविश्वासही कमालीचा वाढू शकेल. कार्यक्षेत्रात यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. तुमच्या आरोग्याची स्थितीही सुधारेल. तरीही आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. योगासने आणि व्यायाम करत राहा, तुमचे आरोग्य चांगले राहील.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा सिंह प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तुमची तब्येत चांगली असल्याचे दिसून येऊ शकेल. सूर्यदेवाच्या मदतीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, जे लोक प्रशासकीय किंवा सरकारी पदांवर काम करत आहेत, अशा लोकांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला तुमच्या मामाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
9 / 9
सूर्याच्या राशीसंक्रमणानंतर २१ ऑगस्ट रोजी बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल. अगदी काही दिवसांसाठी सूर्य आणि बुध सिंह राशीत एकत्रितपणे विराजमान असतील. सूर्य आणि बुधाच्या युतीने शुभ असा बुधादित्य योग तयार होणार आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य