शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धनुर्मासारंभ: धनु संक्रांती ‘या’ ७ राशींसाठी शानदार, जबरदस्त लाभ; सूर्य शुभ-फलदायी ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 2:11 PM

1 / 15
नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत विराजमान झाला आहे. सूर्य प्रत्येक महिन्यात राशीपरिवर्तन करत असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर हा काळ धनुसंक्रांत म्हणून ओळखला जाईल. (sun transit in sagittarius december 2022)
2 / 15
याचप्रमाणे सूर्याच्या धनु राशीतील प्रवेशाचा महिन्याभराचा काळ धनुर्मास म्हणूनही ओळखला जातो. काही शास्त्रांनुसार या काळात शुभकर्म केली जात नाहीत. धनुर्मासात शुभ कार्ये करू नयेत, असे सांगितले जाते. काही ठिकाणी हा काळ खरमास म्हणूनही ओळखला जातो. (surya gochar in dhanu sankranti 2022)
3 / 15
सूर्य मकर राशीत प्रवेश करेपर्यंत धनुर्मास सुरू राहील. मकर संक्रांतीला याची सांगता होईल. सूर्याचा धनु राशीतील प्रवेश सर्व राशींवर परिणाम करणारा ठरणार असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा शुभ लाभ मिळेल आणि कोणत्या राशींना संमिश्र काळ ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती चांगली ठरू शकेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. मुलांचीही प्रगती होईल. नोकरदारांना नवीन पद मिळू शकेल. गुप्त शत्रूंचा पराभव होईल. न्यायालयीन खटल्यांमध्येही सकारात्मक बातमी मिळू शकेल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. चिकित्साशी संबंधित लोकांना भरघोस यश मिळू शकेल. सरकारच्या विभागांमधील काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. पूर्ण लक्ष केंद्रीत करून काम करणे चांगले राहील. संपत्तीसाठी हे संक्रमण खूप चांगले असेल. जुना वाद मिटू शकतो. वाहन चालवताना काही काळजी घ्यावी.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती संमिश्र ठरू शकेल. तुम्ही व्यवसायात चांगली सुरुवात करू शकता. व्यवसाय पुढे नेण्यासाठी चांगले परिणाम मिळू शकतात. काही कामामुळे अनावश्यक धावपळ होईल. भागीदारीतील व्यवसाय करणे टाळा. जास्त पैसे उधार दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. सरकारी विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल तर संधी अधिक चांगली आहे.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती शुभ ठरू शकेल. एक्सपोर्ट इम्पोर्टशी संबंधित लोकांसाठी खूप चांगला काळ आहे. कर्ज मिळू शकेल. न्यायालयीन खटल्यांमधील सकारात्मक बातमी मिळू शकेल. उच्चपदस्थांशी संबंध बिघडू देऊ नका. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक प्रवास करा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती लाभदायक ठरू शकेल. मुलांची प्रगती होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. सूर्य, शुक्र आणि बुध या तिन्ही ग्रहांचा संयोग तुमच्या राशीसाठी खूप चांगला ठरत आहे. कुटुंबात गोड बातमी मिळू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांचे समान सहकार्य मिळेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक बाबींमध्ये चिंता असेल, परंतु आपण परिस्थितीला हुशारीने हाताळण्यास सक्षम असाल. आरोग्याची काळजी घ्यावी. जमिनीशी संबंधित प्रकरणे निकाली निघू शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. तुमची रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केल्यास तुम्ही अधिक यशस्वी व्हाल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती शुभ ठरू शकेल. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल, तितके चांगले फळ मिळू शकेल. मेहनतही सुरू ठेवावी लागेल. तुमचा प्रभाव वाढू शकतो. नशिबाची साथ लाभेल. अनेक कामे पूर्ण होतील. खर्चातही वाढ होईल. सरकारी क्षेत्रातून लाभ होऊ शकतो. विचारपूर्वक केलेली रणनीती कामाच्या ठिकाणी प्रभावी ठरेल. धैर्याच्या बळावर तुम्ही कठीण प्रसंगात यश मिळवू शकाल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती संमिश्र ठरू शकेल. काही कारणास्तव कामांमध्ये अडचण येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांशी संबंधित समस्यांबाबत काळजी घ्यावी लागेल. तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. प्रदीर्घ काळासाठी दिलेले पैसेही परत मिळणे अपेक्षित आहे. घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर अनुकूल काळ राहील. करिअरमध्ये भरपूर यशाची अपेक्षा करू शकता. संपत्ती वाढू शकते. धैर्य वाढेल आणि तुमचा दर्जाही वाढेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती, धनुर्मासाचा काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय आणि क्षेत्रात केलेल्या कामाचेही कौतुक होईल. पूर्ण सहकार्य राहील. भविष्यात तुम्हाला चांगले लाभ मिळतील. सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असेल, तर अनुकूल काळ ठरू शकेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक बातमी मिळू शकेल. सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती मध्यम फलदायी ठरू शकेल. जास्त धावपळ होऊ शकेल. पैशांची चणचण भासू शकेल. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी काळ खूप अनुकूल आहे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती चांगली ठरू शकेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. मनावरील ओझेही हलके होईल. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला काळ आहे. अडकलेली येणी पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. शासकीय संस्थांमधील प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कोणत्याही प्रकारच्या सरकारी निविदांसाठी अर्ज करायचा असेल, तर अनुकूल काळ आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती संमिश्र ठरू शकेल. सरकारी विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. जमीन-मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील. घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर चांगला काळ आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह प्रवासाचा लाभ मिळेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य