शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:08 PM

1 / 15
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नोव्हेंबर महिन्यात शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान झालेला आहे. आगामी महिनाभर सूर्य वृश्चिक राशीत असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करेल. (sun transit in scorpio november 2022)
2 / 15
सूर्य प्रत्येक महिन्याला रास बदलत असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्यामुळे आगामी काळ हा वृश्चिक संक्रांत म्हणून ओळखला जाईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. सूर्य मंगळाच्या राशीत असेल आणि मंगळासोबत सूर्याचा समसप्तक योग तयार होईल. (surya gochar vrishchik sankranti november 2022)
3 / 15
सूर्याच्या वृश्चिक प्रवेशानंतर बुधाशी युती होऊन बुधादित्य नामक राजयोग तयार होत आहे. काही राशींसाठी सूर्याचे वृश्चिक राशीत आगमन खूप फायदेशीर ठरू शकेल. तर काही राशींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल सूर्याचा प्रभाव? जाणून घेऊया... (vrishchik sankranti november 2022)
4 / 15
मेष राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या आगामी काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. परिस्थिती सामान्य राहील. शैक्षणिक क्षेत्रात संमिश्र परिणाम मिळतील. थोडे कष्ट करावे लागतील. तरच फळ मिळेल. घरगुती जीवन सामान्य राहील. मित्रांसोबत कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.
5 / 15
वृषभ राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश शुभ ठरू शकेल. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम देईल. सुरुवातीला तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. परंतु त्यानंतर खूप चांगले परिणाम होतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक वादविवाद टाळा. कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता.
6 / 15
मिथुन राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही तुमची सर्व शक्ती तुमच्या कामात लावाल. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगला असेल.
7 / 15
कर्क राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश शुभ ठरू शकेल. तुम्हाला कार्यक्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही नवीन नोकरी मिळू शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ही वृश्चिक संक्रांत तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ आणि फलदायी ठरेल.
8 / 15
सिंह राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश शुभ ठरू शकेल. व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आर्थिक आघाडी सामान्यपेक्षा चांगला राहू शकेल. नशीबाची उत्तम साथ मिळेल. स्नेहमंडळी, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
9 / 15
कन्या राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी प्रगती होईल. आर्थिक जीवनात संमिश्र परिणाम मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. कायदेशीर प्रकरणात अडकू नका. कौटुंबिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील.
10 / 15
तूळ राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. व्यवसाय करत असाल तर प्रगती होईल. तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकता. कौटुंबिक जीवन शुभ राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद, शांती आणि सौहार्दाचे वातावरण राहील.
11 / 15
वृश्चिक राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश म्हणजेच वृश्चिक संक्रांत या राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य ठरू शकेल. खूप मेहनत करावी लागेल. नोकरीत यश मिळू शकते. व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करावे लागतील. आरोग्य चांगले राहू शकेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतात. शिक्षणानिमित्त तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता. कुटुंबाला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल.
12 / 15
धनु राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि विचार करूनच कामे करा.
13 / 15
मकर राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. मानसिक तणाव वाढवू नका. घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. कौटुंबिक परिस्थिती सामान्य राहील. अकारण थोडा मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाला जाता येईल.
14 / 15
कुंभ राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश अनुकूल ठरू शकेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी काळ संमिश्र जाणार आहे. तुम्हाला स्वतःमध्ये नवीन उर्जेचा संचार जाणवेल. कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याबद्दल तक्रारी असू शकतात.
15 / 15
मीन राशीसाठी सूर्याचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. तब्येतीत चढ-उतार असतील. सूर्याचे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच अंशी चांगले होऊ शकते. धार्मिक व शुभ कार्य झाल्यास मन प्रसन्न राहील. पैसे गुंतवणे टाळा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य