शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वृश्चिक संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, सरकारी नोकरीत यश योग; ३० दिवस ३ राजयोग शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:07 AM

1 / 15
नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत विराजमान झाला आहे. सूर्याचे राशीपरिवर्तन संक्राती काळ म्हणून ओळखले जातो. सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला असल्याने ही वृश्चिक संक्रांती म्हणून संबोधली जाते. एका राशीत सूर्य सुमारे महिनाभर विराजमान असतो. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल.
2 / 15
सूर्याच्या वृश्चिक प्रवेशानंतर ३ राजयोग जुळून आले आहेत. वृश्चिक राशीत मंगळ आणि बुध आधीपासून असून, या दोन ग्रहांच्या संयोगाने अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. मंगळ आणि सूर्य यांचा आदित्य मंगल राजयोग, सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग आणि आयुष्मान राजयोग असे योग जुळून आले असून, याचा काही राशींवर उत्तम, अनुकूल प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
नेतृत्व, मान-सन्मान, उदारता, दानशूरपणा, निस्वार्थीपणा, सात्विकता, तेज, नाव, प्रतिष्ठा, कीर्ती, प्रसिद्धी, दयाळूपणा, लोकप्रियता, विश्वासार्हता, परोपकारी, धार्मिक यांचा सूर्य कारक मानला जातो. सूर्याचा वृश्चिक राशीत झालेल्या प्रवेशाचा मेष ते मीन या सर्व राशींवर प्रभाव दिसून येऊ शकतो. सूर्याची वृश्चिक संक्रांती तुमच्यासाठी कशी ठरेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेम जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नाते टिकवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. वाणी अनुकूल राहिल्यास सामाजिक वर्तुळ वाढेल.
5 / 15
वृषभ: भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर, अनुकूल परिणाम मिळतील. सरकार आणि व्यावसायिक भागीदारांचे पूर्ण सहकार्य मिळेल. चांगला नफा मिळेल. वैवाहिक जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार येतील. जोडीदारासोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतात. दुसरीकडे, अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
6 / 15
मिथुन: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. चांगली कामगिरी करता येईल. काका आणि मामांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नातेही घट्ट होईल. योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. भावंडांसोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो. थोडे सावध राहा आणि त्यांचेही ऐका.
7 / 15
कर्क: मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. करिअरमध्ये प्रगती पाहून आनंदी व्हाल. सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन यश संपादन करता येईल. प्रेम जीवनासाठी आगामी काळ अनुकूल दिसत नाही. नात्यात चढ-उतार येऊ शकतात. गुंतवणूक करायची असेल तर, चांगला नफा मिळेल. आर्थिक आवक चांगली राहू शकेल.
8 / 15
सिंह: भौतिक सुख आणि आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. नवीन घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर ते स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकेल. नोकरदारांना या काळात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. फक्त कामावर लक्ष ठेवा.
9 / 15
कन्या: घरातील वातावरण प्रसन्न राहील. सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. बोलण्याची शैली सुधारेल. व्यावसायिक जीवनात प्रगती दिसेल. व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. परंतु जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ शकतो. सावध राहण्याची गरज आहे. लांबचे नातेवाईक, भावंडे भेटू शकतात. छंद जोपासण्यासाठी या काळात खर्च कमी करावा.
10 / 15
तूळ: जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकेल. पैसे वाचवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. प्रत्येक कामात कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. पण जे काही बोलाल, त्याचा वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो. त्याने गैरसमज होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकेल.
11 / 15
वृश्चिक: अनेक संधी मिळतील. भविष्यासाठी उत्तम ठरू शकतील. नेतृत्व क्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. सहकारी आणि वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. अनेक लोक गैरफायदा घेऊ शकतात, सावध राहणे आवश्यक आहे. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
12 / 15
धनु: स्वतःची, कुटुंबाच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तिथे जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेऊ शकता. जीवनशैलीत चांगली सुधारणा होईल. अध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. गुरूचा शोध पूर्ण होईल. कौटुंबिक सदस्यासोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे नाराज होऊ शकता.
13 / 15
मकर: प्रिय व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक जीवनात चांगले नेटवर्क तयार कराल. व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. निधीत चांगली वाढ होईल. प्रेम जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. आगामी काळ चांगला जाईल.
14 / 15
कुंभ: करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी नवीन उर्जेने काम करायला आवडेल. यशस्वी नेतृत्वाचे कौतुक होईल. अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्वाभिमान अहंकारात बदलू शकतो. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येऊ शकतील.
15 / 15
मीन: अपेक्षित परिणाम मिळू शकतील. वडिलांचे आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक समस्याही दूर होतील. धार्मिक कार्यात रस असेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाण्याचा विचार करू शकेल. संभाषणामुळे इतर लोक प्रभावित होतील. आदर वाढेल. जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य