शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्य गोचर: ‘या’ १० राशींना अनुकूल काळ, पैसा-प्रतिष्ठेत वृद्धी; वृषभ संक्रांत शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 10:00 AM

1 / 15
नवग्रहांचा राजा असलेला सूर्य मंगळाच्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या राशी संक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशानंतर आगामी महिनाभराचा काळ वृषभ संक्रांत म्हणून ओळखला जाईल.
2 / 15
सूर्य ग्रह एका राशीत सुमारे महिनाभर विराजमान असतो. १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करत असून, १५ जूनपर्यंत या राशीत असेल. सूर्याचा वृषभ प्रवेश महत्त्वाचा मानला गेला आहे. सूर्याच्या वृषभ प्रवेशाचा अर्थव्यवस्था, देश-दुनियेसह १२ राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
सूर्याचा वृषभ प्रवेश १० राशींसाठी अनुकूल राहू शकेल, असे सांगितले जात आहे. नोकरी, बिझनेस, गुंतवणूक, आर्थिक आघाडी, कुटुंब या संदर्भात वृषभ संक्रांतीचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय सावधगिरी बाळगावी? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत सकारात्मक ठरू शकेल. कामांमध्ये उत्साही राहू शकाल. ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. विचारपूर्वक बोला. अन्यथा कामात समस्या, अडचणी येऊ शकतात. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात असलेल्यांसाठी हा कालावधी उत्तम जाऊ शकेल. मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील.
5 / 15
वृषभ राशीत सूर्याचा प्रवेश होत आहे. या राशीच्या व्यक्तींना वृषभ संक्रांत प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो. नम्र राहा. कामावर लक्ष केंद्रित करा. आईकडून चांगले लाभ होऊ शकतील. नातेसंबंध मजबूत होऊ शकतील.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत चांगली जाऊ शकेल. काहीतरी चांगले खरेदी करू शकता. भावंडांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहू शकेल. अधिक उत्साह वाटू शकेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधू शकतील. सरकारी क्षेत्राकडून चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. भावंडांसोबत गैरसमज वाढल्याने मतभेद होऊ शकतात. बिझनेस ट्रिपला जात असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन मित्र बनवण्याची घाई करू नका, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्य परदेशात जाण्याचा विचार करत असेल तर त्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत यशकारक ठरू शकेल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकेल. रखडलेल्या कामांना गती मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात चांगली वाढ होऊ शकेल. भावंडांसोबतचे नाते घट्ट होऊ शकेल. सहलीला जाण्याची योजना आखू शकाल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत अनुकूल ठरू शकेल. कामाच्या संदर्भात काही योजना आखू शकाल. यशस्वी अंमलबजावणीसाठी काही प्रवास करावे लागू शकतील. पालकांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत भविष्यासाठी काही योजना आखू शकाल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. जमीन खरेदी करण्याची योजना आखू शकता. नोकरदारांना मोठे पद मिळू शकते.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत अनुकूल ठरू शकेल. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होऊ शकतात. समाजातील काही बड्या लोकांशी चांगले संपर्क निर्माण होऊ शकतात. भविष्यात त्याचा फायदा होऊ शकेल. कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत सकारात्मक ठरू शकेल. मुलाच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. समाजात चांगले स्थान मिळू शकेल. कौटुंबिक सदस्याच्या तब्येतीची काळजी असू शकते. धावपळ करावी लागू शकेल. नोकरदारांनी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या चर्चेपासून दूर राहावे. धर्म आणि अध्यात्माशी जोडले जाऊ शकेल. मनाला शांतता मिळू शकेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत अनुकूल ठरू शकेल. काही कारणांमुळे अस्वस्थ वाटू शकेल. मित्रांसोबत संबंध मजबूत असतील. एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहाल. जोडीदारासोबत गोष्टीवरून वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु हुशारीने परिस्थिती हाताळू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना काळजी घ्यावी लागेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांत सकारात्मक ठरू शकेल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होऊ शकेल. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसे कुठेतरी अडकले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृषभ संक्रांतीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक समस्येने त्रस्त होऊ शकाल. मात्र, ध्येयापासून विचलित होणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणाम मिळू शकतील. कोणतेही कर्ज घेतले असेल, तर त्यातून मुक्त होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना उत्पन्न वाढवण्यासाठी पार्ट टाइम काम करण्याची संधी मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य