शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कन्या संक्रांती: ७ राशींवर सूर्याची मेहेरबानी, धनलाभात वृद्धी; गणपतीत शुभ-लाभ-समृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा राजा मानला गेलेला रवी म्हणजेच सूर्य राशीपरिवर्तन करत आहे. सूर्य स्वराशीतून म्हणजेच सिंह राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत विराजमान होत आहे. गणेशोत्सवाला काही तासांत प्रारंभ होत असून, सूर्याचे गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य कन्या राशीत असेल.
2 / 15
सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. त्यामुळे कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण कन्या संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्य हा आत्मा आणि जीवनकारक मानला जातो. सूर्य हा जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत मानला जातो. संपूर्ण जगाला ऊर्जा आणि शक्ती सूर्य प्रदान करतो. सूर्य हा प्रकाशाचा ग्रह आहे, जो मनुष्याच्या इच्छाशक्ती, चेतना आणि एकूण भावनांवर प्रभाव टाकतो, असे म्हटले जाते.
3 / 15
१७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत विराजमान झाला आहे. कन्या संक्रांतीला रवी नामक शुभ योग जुळून आलेला आहे. कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान असेल तर जीवनात अनेक शुभ फल प्राप्त होतात. याशिवाय नोकरी-व्यवसायात प्रगती आणि संपत्ती व मान-सन्मान वाढते. सूर्याची स्थिती प्रतिकूल असेल तर काही ना काही चढ-उतारांना सामोरे जावे लागते. सूर्य संक्रमणाचा प्रभाव देश, जगासह सर्व राशींवर पडतो. मेष ते मीन राशींसाठी सूर्याची कन्या संक्रांती कशी असेल? पाहुया...
4 / 15
मेष: खूप फायदे मिळू शकतात. वडिलांसोबत नाते मजबूत होईल. काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील आणि शुभ परिणाम मिळतील. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ राहील.
5 / 15
वृषभ: नशीब उजळेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसाय, करिअरसाठी हे संक्रमण खूप चांगले असेल. सोशल नेटवर्किंग आणि आर्थिक लाभासाठी उत्तम काळ. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
6 / 15
मिथुन: अडकलेले पैसे मिळतील. घरगुती बाबींमध्ये खूप फायदा होईल. घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकते. करिअर, नोकरी, व्यवसायात उत्पन्न वाढीच्या शुभ संधी मिळतील. भविष्यात चांगला फायदा होईल. मुलांशी एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील.
7 / 15
कर्क: आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने सर्व कामे पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना कराल. भावंडांसोबत नाते अधिक घट्ट होतील. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांच्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात, परंतु परिस्थिती नियंत्रणात राहील.
8 / 15
सिंह: प्रभावी बोलण्याने इतरांचे लक्ष वेधून घ्याल. प्रयत्नांमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सूर्याचे गोचर फायदेशीर ठरेल. या काळात कोणाशीही पैशांची देवाणघेवाण टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता आहे. चिंतेत राहाल. वैवाहिक जीवनाबाबत जागरुक राहा.
9 / 15
कन्या: या काळात घरात अधिक चिडचिड होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चढ-उतारांचा असेल. काही बाबतीत चांगला नफा मिळेल तर काही बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागेल. कुटुंबियांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचे बेत आखाल.
10 / 15
तूळ: या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. भावंडांसह सहलीला जाऊ शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक लाभाची शुभ शक्यता आहे. वडिलांसोबत काही मुद्द्यावरून मतभेद वाढू शकतात. त्यामुळे नाराज होऊ शकता. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.
11 / 15
वृश्चिक: ज्यांना पद आणि पगारात वाढ अपेक्षित आहे, त्यांच्या इच्छा या काळात पूर्ण होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सहलीला जाण्याची योजना आखू शकता. भावंडांशी संबंध दृढ होतील आणि त्यांच्या मदतीने अनेक घरगुती कामे पूर्ण होतील.
12 / 15
धनु: हे संक्रमण जीवनात विपुलता, नशीब आणि समृद्धी आणेल. ज्यांना नोकरी बदलण्याची किंवा दुसर्‍या शहरात बदलीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी सूर्य संक्रमणाची ही वेळ विशेषतः योग्य आहे. या काळात वडील, गुरु आणि शिक्षक यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या आणि प्रेम जीवन मजबूत होईल.
13 / 15
मकर: कुटुंबीयांसह किंवा भावंडांसोबत कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावे लागेल. सूर्याच्या संक्रमणामुळे वडिलांशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. अचानक आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशांची बचत करण्यात यश मिळेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.
14 / 15
कुंभ: जीवनात विविध आव्हाने निर्माण करेल. यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी आणि सासरच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक तसेच नोकरदारांनी या काळात स्वतःच्या कामाकडे लक्ष घालावे, अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
15 / 15
मीन: बुद्धीचा विकास होईल. ज्ञान आणि आदर वाढेल. सासरच्या लोकांकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबात काही घटना घडू शकतात. मित्रांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. सर्व कामे पूर्ण होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य