शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 5:06 AM

1 / 15
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान झाला आहे. १७ ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला असून, सिंह संक्रांती सुरू झाली आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य सिंह राशीत असेल. आताच्या घडीला नवग्रहांचा राजकुमार बुध आणि नवग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीत विराजमान आहेत. यामुळे सिंह राशीत अनेकविध शुभ योग जुळून आले आहेत.
2 / 15
सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. तर, सूर्य, चंद्र, बुध आणि मंगळाचा चतुर्ग्रही योग सिंह राशीत जुळून आला आहे. हा योग अवघ्या काही तासांसाठी असेल. १८ ऑगस्ट रोजी मंगळ आणि चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे यानंतर या योगाची सांगता होईल. सूर्याच्या सिंह प्रवेशाने मेष राशीत विराजमान असलेल्या गुरु ग्रहाचा नवमपंचम योग जुळून येत आहे.
3 / 15
काही पुराणांनुसार सूर्य आणि शनी पिता-पुत्र मानले गेले आहेत. शनी कुंभ राशीत विराजमान आहे. सूर्य सिंह राशीत विराजमान होताच या दोन्ही ग्रहांचा समसप्तम योग जुळून येत आहे. म्हणजेच शनी आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या स्थानी विराजमान असतील. सूर्यासह बुध आणि मंगळाचा शनीसोबत समसप्तम योग जुळून येत आहे. मंगळाच्या राशीपरिवर्तनानंतर शनी-मंगळाचा समसप्तक योग समाप्त होईल. याशिवाय धनयोगही जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. या एकूणच ग्रहस्थितीचा मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: विद्यार्थ्यांना मेहनतीचा पुरेपूर लाभ मिळेल. स्पर्धेत यश मिळू शकेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. लव्ह लाइफमध्ये भविष्याचा निर्णय घेऊ शकता. रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी व्यवसायात नफा आणि प्रगती साध्य करता येऊ शकते.
5 / 15
वृषभ: सूर्याची सिंह संक्रांती लाभदायक ठरू शकेल. खूप फायदा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी हा कालावधी योग्य असेल. कौटुंबिक जीवन असो किंवा कामाचे ठिकाण, अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला घ्यावा, त्याचा लाभ होईल. मतभेद आणि वाद टाळावेत. सुख-साधनांची प्राप्ती होऊ शकेल.
6 / 15
मिथुन: आत्मविश्‍वासात वाढ होऊ शकेल. मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा सल्लामसलत इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना काळ चांगला राहील. संवाद साधण्याची क्षमता महत्त्वाची भूमिका राहील. क्षमता वाढेल. वडिलांशी संबंध सौहार्दाचे असतील. भावंडांशी नाते मजबूत होऊ शकेल. धाडसी निर्णयांचा फायदा होईल.
7 / 15
कर्क: सूर्याची सिंह संक्रांती फलदायी सिद्ध होऊ शकेल. नोकरी व्यवसायात लाभ मिळेल. या दरम्यान घरच्यांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी जे ज्योतिष, अंकशास्त्र किंवा इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित आहेत. शोध किंवा संशोधन कार्याशी संबंधित असलेल्यांना प्रयत्नात चांगले यश मिळेल. ज्ञानाचा आणि बौद्धिक क्षमतेचा भरपूर फायदा होईल.
8 / 15
सिंह: सूर्याचा स्वराशीत होत असलेला प्रवेश अनुकूल ठरू शकेल. आत्मविश्वास, साहस, संयम आणि धैर्य उत्तम असेल. उत्साही वाटेल. प्रतिकारशक्ती वाढू शकेल. मात्र, सूर्य संक्रमणाने गर्विष्ठ आणि आक्रमक होऊ शकाल. वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारचे मतभेद टाळा. राजकारणात प्रभाव वाढेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे होतील.
9 / 15
कन्या: आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. न्यायालयीन निर्णय सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे पैसे खर्च करावे लागतील. हा महिना खर्चिकही असेल. प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल.
10 / 15
तूळ: सूर्याची सिंह संक्रांती लाभदायक ठरू शकेल. धन-धान्य, सुखाची प्राप्त होऊ शकेल. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आगामी काळ खूप शुभ आणि लाभदायक असेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी फलदायी ठरेल. परंतु कठोर परिश्रम करावे लागतील. गेल्या एक वर्षात करिअर आणि व्यवसायात कितीही मेहनत घेतली असेल, याची फळे रवि आर्थिक लाभ, सन्मान आणि ओळख या स्वरूपात देईल.
11 / 15
वृश्चिक: सूर्याचे सिंह राशीत होणारे संक्रमण खूप शुभ राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्या लोकांची पदोन्नती रखडली आहे, त्यांना पदोन्नती आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा किंवा नोकरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. वडील आणि कुटुंबातील वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.
12 / 15
धनु: जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. वडील, गुरु यांचे सहकार्य मिळेल. तीर्थयात्रेला जाऊ शकता. गुंतवणुकीमुळे नफाही मिळेल. व्यवसायाच्या विस्तारासाठी वेळ अनुकूल आहे. कुठूनतरी धनलाभ होऊ शकेल.
13 / 15
मकर: सासरच्या मंडळींशी संबंध योग्यरित्या हाताळावे लागतील. एखाद्या गोष्टीबाबत परस्पर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी संशोधन किंवा ज्योतिष इत्यादीसारख्या गूढ शास्त्रांचा अभ्यास करत आहेत त्यांना यावेळी शुभ परिणाम मिळतील. सरकारी बाबींमध्ये धोका पत्करणे टाळावे लागेल. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल.
14 / 15
कुंभ: आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. सूर्य आणि राशीचा स्वामी शनि यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होक आहे. कौटुंबिक जीवनात उलथापालथ होऊ शकते. वडील आणि मुलामध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद आणि वाद होण्याची शक्यता आहे. समन्वयावरही परिणाम होईल. भागीदारीत कोणतेही काम करणार असाल तर कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
15 / 15
मीन: कायदेशीर बाबींमध्ये खूप फायदा होईल. शत्रूंनी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी ते नुकसान करू शकणार नाहीत. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विविध कारणांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. मानसिक तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाशाची समस्या होऊ शकेल. कामाचा ताण राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशल